आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

135 रुपयांची दुधाच्या ड्रिंकची बाटली गेली चोरीला, आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी जे केले त्यावरून उडवली जातेय खिल्ली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तैपेई - तैवानमध्ये पोलिसांनी तपास करताना एक विचित्र प्रकार केला आहे. त्यामुळे सगळीकडे त्यांची खिल्ली उडवली जात आहे. याठिकाणी पोलिसांनी दुधाच्या एका ड्रिंकच्या चोरी झालेल्या बाटलीला शोधण्यासाठी DNA टेस्टची मदत घेतली. विशेष म्हणजे या बाटलीची किंमत फक्त 125 रुपये होती. पण DNA टेस्टवर पोलिसांनी 41 हजार रुपये खर्च केले. यावरून पोलिसांची खिल्ली उडवली जात आहे. 


रिकामी बाटली घेऊन पोलिसांकडे आली मुलगी 
- तैपेईमध्ये नुकतीच एक मुलगी तिची योगर्ट (दुधाचे ड्रिंक) ची बाटली चोरी झाल्याची तक्रार घेऊन आली. ही मुलगी चायनीज कल्चर युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होती आणि इतर पाच मुलींबरोबर रूम शेअर करून राहते. 
- सोबतच्या मुलींपैकी कोणीतरी तिचे योगर्ट न विचारता पिले अशी तक्रार तिने केली. तरुणींना विचारले तेव्हा मात्र कोणीही हे मान्य केले नाही. 
- यानंतर तरुणीने घराच्या डस्टबिनमधून ती रिकामी बाटली काढली आणि ती घेऊन पोलिसांत पोहोचली. तरुणीने चोरांचा पत्ता शोधण्यासाठी तक्रार दिली आणि पोलिसांना तपास करण्यास सांगितले. पोलिसांनीही तपास सुरू केला. 


तपासासाठी केली DNA टेस्ट
- तरुणीने जी बाटली आणून दिली ती फार ओली होती. त्यामुळे तिच्यावरील फिंगरप्रिंट घेणे शक्य नव्हते. त्यानंतर तरुणीने दूध कोण प्यायले याचा शोध घेण्यासाठी इतर मुलींची डीएनए टेस्ट घेण्यास सांगितले. 
- त्यानंतर पोलिसांनी पाचही संशयित रूम मेट्ससह तक्रार करणाऱ्या मुलीलाही पोलिस ठाण्यात बोलावले आणि फॉरेन्सिक तपासासाठी सॅम्पल देण्यास सांगितले. या एका DNA टेस्टसाठी पोलिसांना सुमारे 6876 रुपये खर्च आला. 
- पोलिसांनी सर्व सहा मुलींची टेस्ट केली. DNA टेस्टसाठी त्यांचे 41 हजार खर्च झाले. पण अद्याप चोरांचा तपास लागलेला नाही. 
- हा फालतू खर्च असल्याचे म्हणत लोक संताप व्यक्त करत आहे. लोकांच्या मेहनतीचा कराचा पैसा उडवण्याचा आरोप पोलिसांवर होत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...