आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई करत नसल्याने बुटखेडा गावातील महिलांनीच पकडून दिली दारू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना/टेंभुर्णी - गावात अवैध दारू सुरू असल्याबाबत महिलांसह ग्रामस्थांनी निवेदन देऊनही पोलिसांनी कारवाई केली नसल्याने महिलांनी विक्रेत्याच्या घरी जाऊन ४८ बाटल्यांच्या दारूचा बॉक्स पोलिसांना पकडून दिला आहे. यानंतर पोलिसांनी येऊन दारू विक्रेत्यास ताब्यात घेतले. ही घटना जाफराबाद तालुक्यातील बुटेगाव येथे रविवारी घडली. 


निवेदन देऊनही पोलिसांनी दारू विक्रेत्यावर कारवाई न केल्यामुळे अंगणवाडी सेविका, इतर महिलांनी गावात अवैध दारू विक्री करणारा अंकुश पांडव याला रविवारी रंगेहाथ पकडून दारूचे बॉक्स ताब्यात घेतले. दारू पकडण्यासाठी मीना साबळे, विमल पांडव, उषा चंदनशिवे, शोभा पांडव, रेखा खरात, अरुणा पांडव, नंदा पांडव, मीरा पांडव, अनिता पांडव, सिंधू पांडव, सविता पांडव, वर्षात साबळे, कडूबाई बनकर यांच्यासह इतर महिलांनी सहकार्य केले. दरम्यान, विद्यमान उपसरपंच प्रकाश पांडव, माजी सरपंच दुर्योधन बदल यांनी या महिलांना सहकार्य करून दारू विक्रीला आळा घालण्यासाठी दारू पकडून दिली.