आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देहविक्रयाचा अड्डा बनले होते भाड्याचे घर; शेजाऱ्यांनी तक्रार करताच पोलिसांनी टाकली धाड, 5 तरुणींसह 7 जणांना अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - येथील लिम्बोदी भागात शनिवारी गुन्हे शाखेने भाड्याच्या घरात सुरु असणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांनी येथून पाच मुलींसह 7 जणांना नको त्या अवस्थेत पकडले. याठिकाणाहून मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह सामानासोबत 22 हजार रूपये रोख जप्त केले आहे. सध्या पोलिस संबंधीत प्रकरणाची चौकशी करत आहेत. 

 

आक्षेपार्ह सामानासह 22 हजार रुपये आणि 6 मोबाइल जप्त
गुन्हे शाखेचे एसपी अमरेंद्र सिंह यांनी सांगितले की, तेजाजी नगर भागातील लिम्बोदी गावात शिव मंदिराजवळील एका घरात अवैधरित्या देह व्यापार चालवला जात असल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार येथे छापा मारला असता युवक आणि युवती नको त्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांना येथील येथील युवक आणि युवतींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांना झाडाझडती घेतली असता येथून मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह सामानासह 22 हजार 470 रूपये रोख आणि सहा मोबाइल मिळाले. 

 

मुंबई आणि कोलकातात आहेत महिलेचे दलाल
रॅकेट चालवणाऱ्या महिलेने सांगितले की, ती अनेक दिवसांपासून या किरायाच्या घरात हा अनैतिक देह व्यापाराचा धंदा चालवत आहे. ती ग्राहकांना खेचून आणण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलींचे आकर्षक फोटो पाठवत होती. ती ग्राहकांना फोन करून किरायाच्या घरी बोलावत होती. पुढे बोलतांना सांगितले की, मुंबई आणि कोलकाता येथेही तिचे दलाल आहेत. त्यांच्याशी फोनवर संवाद साधत तेथील मुली देह व्यापारासाठी इंदूरला आणण्यात येत होत्या. त्या मुलींना महिनाभराचा अॅडव्हान्स देण्यासोबतच त्यांच्या राहण्याची व्यवस्था करावी लागत असल्याचे महिलेने सांगितले.