आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूज शिपवर सुरु होती सीक्रेट पार्टी, पोलिसांनी छापा मारल्यानंतर उडाला गोंधळ, एका बॅगकडे पाहून सतत भुंकत होता डॉगी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्लोरिडा. अमेरिकेत पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर छापा मारला, तेव्हा त्यांनी आपल्या एका डॉगीच्या मदतीने अमली गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला. पण या कारवाईदरम्यान त्यांच्या डॉगीला विचित्र स्थितीचा सामना करावा लागला. जेव्हा डॉगीने अमली पदार्थांनी भरलेल्या बॅगला वास घेतला तेव्हा या गोळ्यांचा प्रभाव त्या डॉगीवर झाला. त्याला नशा चढली आणि तो यामुळे घुमू लागला. 

 

डॉगीला उभे राहणेही झाले होते कठीण 
- ही घटना नुकतीच फ्लोरिडाच्या पोर्ट केनावेरेन परिसरात घडली. येथे 'होली शिप' नावाच्या जहाजावर एक सीक्रेट रेव्ह पार्टी सुरु होती. या पार्टीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा वापर होत असल्याचे वृत्त पोलिसांना मिळाले आणि त्यांनी छापा मारला. 
- या अमली गोळ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस त्यांच्या डॉगीला सोबत घेऊन गेले. शिपवर पोहोचताच तपासादरम्यान एका व्यक्तीला पाहून तो डॉगी भुंकू लागला. 
- जॅक पळतच त्याच्या समानाजवळ पोहोचला आणि वास घेऊन काही इशारे करु लागला. पोलिसांनी बॅग उघडून पाहिली तेव्हा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अमली गोळ्या आढळल्या. 
- बॅगचा शोध घेतल्यानंतर अचानक त्या डॉगीची तब्येत बिघडली. या अमली पदार्थांचा वास घेतल्यामुळे त्याला त्रास झाला. 
- त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आले तेव्हा त्यांनी त्याला काही औषधी देऊन त्याच्यावर उपचार केले. लवकरच त्याची स्थिती सुधारेल असेही सांगण्यात आले. सध्या डॉगी पुर्णपणे ठिक आहे. 

बातम्या आणखी आहेत...