आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Police Father Killed Own Son For Illicit Relationship With Niece In UP Latest News

पुतणीच्या प्रेमात फौजदार झाला बेभान, मुलाने विरोध केल्यावर केले असे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाराबंकी - अवैध संबंध कुणाचेच हित करत नाहीत. उलट व्यक्तीला गुन्ह्याच्या दलदलीत ढकलत असतात. मग समोर एखादा सगासोयरा का असेना. बाराबंकीतही असेच काहीसे झाले, हे पाहणाऱ्यांचा थरकाप उडाला आहे. एका फौजदाराने आपल्याच पुतणीसोबत अवैध संबंधांत अडसर ठरणाऱ्या स्वत:च्या मुलाची हत्या करून त्याला आत्महत्येचे रूप दिले. हा फौजदार प्रतापगडमध्ये तैनात आहे. मृत मुलाच्या पत्नीचा आरोप आहे की, वडील पोलिसांत असल्याने त्यांची कोणीही तक्रार घेत नाहीये. मृत मुलाची पत्नी आपल्या माहेरच्यांसोबत पोलिस अधीक्षक कार्यालयात गेली.

 

मृत तरुणाच्या पत्नीच्या खुलाशाने खळबळ

बाराबंकीतील टिकैतन पुरवा गावात काही दिवसांपूर्वी एका बातमीने खळबळ उडाली की, फौजदाराच्या मुलाने आत्महत्या केली. आत्महत्याच समजून पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला. परंतु फौजदाराचा मुलगा आशुतोष सिंहच्या पत्नीने पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन असा खुलासा केला की, मोठी खळबळ उडाली. मृत तरुणाच्या पत्नीने सांगितले की, तिच्या पतीने आत्महत्या केलेली नसून त्यांची हत्या झालेली आहे. आणि हत्या करणारे दुसरे कुणी नसून तिच्या पतीचे वडीलच आहेत.


फौजदाराचे स्वत:च्या पुतणीशी अवैध संबंध

मृत आशुतोष सिंहची पत्नी हर्षिता सिंह म्हणाली की, तिचा सासरा फौजदार जगन्नाथ सिंहचे आपली पुतणी गरिमा सिंहसोबत अवैध संबंध आहेत. याचा आशुतोष नेहमी विरोध करत होता. परंतु सासरा या अवैध संबंधात एवढा आंधळा झाला की, त्याने आपल्याच मुलाची हत्या केली. आणि या हत्येला आत्महत्येचे रूप देण्याचा पूर्ण कट रचला. 


पुतणीसाठी वेडा झाला होता फौजदार
मृत आशुतोषच्या सासू राजेशकुमारी म्हणाल्या की, काही दिवसांपूर्वीच त्या जावयाच्या घरी गेल्या होत्या. तेव्हा आशुतोष त्यांना म्हणाला होता की, मला घेऊन चला नाहीतर हे लोकं माझी हत्या करतील. यावर जगन्नाथ सिंहने आपला मुलगा, सुनेला खूप बरेवाईट ऐकवले. जगन्नाथ सिंह गरिमा सिंहच्या प्रेमात एवढा वेडावला होता की, तो आपले सर्व पैसे तिच्याच खात्यात ठेवायचा. तो आपल्या पत्नी-मुलांनाही सोबत ठेवत नव्हते, कारण त्याच्यासोबत गरिमा राहायची. ही हत्या अवैध संबंधांमुळेच झाली आहे. 


काय म्हणतात पोलिस?
दुसरीकडे, या आरोपांवर बाराबंकीचे पोलिस अधीक्षक व्ही. पी. श्रीवास्तव म्हणाले की, टिकैतन गावातील एक फौजदाराच्या मुलाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. परंतु मृताच्या पत्नीचा आरोप आहे की, सासऱ्यानेच ही हत्या केली आहे. आता या तक्रारीवरून प्रकरणाचा नव्याने तपास सुरू केला आहे. यात जे काही तथ्य समोर येतील त्यानुसार योग्य ती कारवाई निश्चितपणे केली जाईल.  

 

बातम्या आणखी आहेत...