आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोविंद निहलानींच्या ‘अर्धसत्य’ मधील अमरीश पुरी अभिनीत हवालदाराचे पात्र ओम पुरी या मुलाच्या अभिनीत पात्रावर पोलिसात भरती होण्यासाठी दबाव टाकते. ओम पुरीला साहित्याविषयी विशेष आस्था असते, परंतु वडिलांच्या इच्छेनुसार त्याला पोलिस उपनिरीक्षक बनावे लागते. धाडसाने तो एका डाकूच्या टोळीला पकडतो, परंतु त्याचे श्रेय एका राजकीय नेत्याच्या आश्रित पोलिस अधिकाऱ्याला दिले जाते. यामुळे चिडलेला ओम पुरी दोन आरोपींना इतके मारतो, की त्यात त्यांचा मृत्यू होतो. प्रकरण चिघळते व यातून शेट्टी नामक एक डॉनच त्याच्या राजकीय संबंधांमुळे यातून त्याला काढू शकतो. ओम पुरी त्या गॉडफादरच्या भव्य बंगल्यात जातो. शेट्टी त्याला या शर्तीवर मदत करण्याचे बोलतो, की इथून पुढे तो पोलिसात राहून त्याच्यासाठीच काम करेल. या वेळी ओम पुरी शेट्टीची हत्या करत स्वत: पोलिसात आत्मसमर्पण करतो. सलीम-जावेदच्या ‘आक्रोश’ मधील पोलिस पात्र आपल्या आईवडिलांवर झालेल्या अन्यायाचा बदला घेते. परंतु ते सामाजिक आक्रोशाचे संचालित पात्र म्हणता येणार नाही. ‘अर्धसत्य’ ची पटकथा विजय तेंडुलकर यांची होती. गोविंद निहलानींच्या ‘देव’ मध्ये अमिताभ बच्चन, ओम पुरी, करिना कपूर व फरदीन यांच्या भूमिका होत्या, तर अमिताभ व ओम पुरी जुने मित्र असतात, त्यांचे एकाच बॅचमध्ये प्रशिक्षण झालेले असते. ओम पुरींची एका दंगलग्रस्त भागात नियुक्ती झालेली असते. तरुण फरदीन सुशिक्षित असून त्याला काही जण वाममार्गाला लावतात. शांततेत आंदोलन करणाऱ्यांना पोलिस लाठीमार करतात आणि गोळीबारात २० जण मरण पावतात. ओम पुरी घटनास्थळावर असताे. त्याच्या चौकशीसाठी अमिताभ यांची नियुक्ती करण्यात येते. यापूर्वी घडलेल्या अशाच एका घटनेत अमिताभचा एक नातेवाईक मृत्यू पावलेला असतो. यात नाती गुंतलेली आहेत. एक दृश्यात करिना कपूर आपल्या समाजाच्या सभेत समाजाच्या स्वयंभू नेत्याचे कुचकामीपण जाहीर करते, त्यामुळे समाज तिच्यावर नाराज असताे. भारतीय पोलिस अनेक अनुभवातून गेलेले आहेत. इंग्रजांच्या काळात त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे आपल्याच माणसांवर लाठीहल्ला केला व गोळ्याही झाडल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर त्या पोलिसांना त्यांनाच मुजरा करावा लागला, ज्यांच्यावर त्यांनी लाठ्या चालवल्या होत्या. अपराधीवृत्तीच्या नेत्यांची सुरक्षा पोलिसांना करावी लागत आहे. सण-उत्सवात कुटुंबासोबत पोलिस वेळ व्यतीत करू शकत नाहीत. सुभाष कपूर यांच्या ‘जॉली एलएलबी-२’ मध्ये वरकमाई असणाऱ्या पोलिस ठाण्यात नियुक्तीसाठी अघोषित लिलाव होत असल्याचे दर्शवण्यात आले आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्या विभागावर बेकायदा दबाव बनवला जात आहे. प्रकाश झा यांचा ‘दामुल’, ‘मृत्युदंड’ आणि ‘गंगाजल’ मध्ये ही समस्या दर्शवली आहे. ‘वेन्सडे’ मध्ये अनुपम खेरचे पोलिसी पात्र नसिरुद्दीन अभिनीत पात्रच मोकाट सुटलेल्या दहशतवाद्यांना संपवत असल्याचे समजते. हे माहीत असूनही अनुपम खेर त्याला अटक करत नाहीत. के. भाग्यराज यांच्या ‘आखिरी रास्ता’ मध्ये अमिताभ बच्चनचा डबलरोल असून एक जण पोलिसाच्या भूमिकेत तर दुसरा पत्नीवरील अत्याचाराचा बदला घेणाऱ्या वडिलांच्या भूमिकेत आहे. सलीम-जावेद यांनी अशोककुमार अभिनीत ‘संग्राम’ वरून दिलीपकुमार व बच्चन यांचा ‘शक्ती’ बनवला. त्या पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाला अपहरण करून आरोपींना सोडण्यासाठी दबाव टाकला जातो. परंतु अधिकारी तटस्थ राहिल्याने त्याचा परिणाम त्या मुलावर होतो. प्रत्येक देशातील पोलिस त्या देशातील जनतेप्रमाणेच आचरण करत असते. परंतु काही वर्षांपासून लाचखाेरीचा बाेलबाला सुरू झाला असून आता या न्यायमंदिरात न्याय मागण्यासाठी काहीतरी प्रसाद चढवावा लागतो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.