आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेवारस मृतदेहाच्या विल्हेवाटीसाठी पोलिसांना मिळतात हजार रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यानंतर बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठीच्या रकमेत पाचपट वाढीचा निर्णय दोन महिन्यांपूर्वीच झाला. मात्र भुसावळ विभागातील काही रेल्वे स्थानक प्रशासन अजूनही एक हजार रुपयांवर पोलिसांची बोळवण करत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या या असहकार्याबद्दल रेल्वे पोलिसांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.  


भुसावळ विभागातील बडनेरा, शेगाव, अकोला, नांदुरा व मलकापूर येथील रेल्वे पोलिसांना बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी  एक हजार रुपयेच मिळत आहेत. रेल्वे अपघातात मृत्यू झालेले, रेल्वे परिसरात आढळलेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पूर्वी रेल्वे प्रशासनाकडून पोलिसांना एक हजार रुपये मिळत होते. ही रक्कम अपुरी पडत असल्याने रेल्वे मंत्रालयाने १५ जून २०१८ रोजी पाच पट रक्कम देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय देशातील रेल्वेच्या सर्व विभागांना पत्राद्वारे कळवला. नांदेड, नागपूर विभागात याची अंमलबजावणी सुरु झाली असताना भुसावळ विभागातील काही रेल्वे स्थानक प्रशासनाकडून नवीन आदेशाविषयी अनभिज्ञता दाखवण्यात येत आहे. 


वरिष्ठांकडून टोलवाटोलवी सुरु
एक हजार रुपये रक्कम पोलिसांच्या हातात देण्यात येत असल्याने पोलिसांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त होत आहे. अनेकदा पोलिसांनीच संबंधित रेल्वे स्थानक प्रशासनाला रेल्वे प्रशासनाचा निर्णयही दाखवला मात्र वरिष्ठांकडून लेखी आदेश नसल्याचे कारण समोर करून टोलवाटोलवी सुरु असल्याची भावना पोलिसांनी या वेळी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...