इंडोनेशियात गुन्ह्याची कबुली देण्यासाठी गळ्यात घातला साप; घटनेचा व्हिडिओ व्हायरल
वृत्तसंस्था | Update - Feb 14, 2019, 12:24 PM IST
पोलिसांनी फोन चोरी केल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीस अटक केली होती.
-
जकार्ता- इंडोनेशियातील पापुआमध्ये आरोपीने गुन्ह्याची कबुली द्यावी म्हणून पोलिसांनी त्याच्या गळ्यात विषारी साप टाकला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी पोलिसांवर टीकेची झोड उठवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी जाहीर माफी मागितली . पोलिसांनी फोन चोरी केल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीस अटक केली होती. पोलिस त्याची चाैकशी करत होते. तो गुन्हा कबूल करत नव्हता. तेव्हा पोलिसांनी गळ्यात साप सोडला.दरम्यान संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
-
-
More From International News
- इराकमध्ये 25 वर्षीय महिलेने दिला सात मुलांना जन्म, यात 6 मुली व 1 मुलगा; सर्वांची प्रकृती उत्तम
- झोपमोड होऊ नये म्हणून शरीराच्या सोयीनुसार स्मार्ट बेड बदलेल तापमान; एआय आणि सेन्सरमुळे तापमानावर नियंत्रण
- ऑस्ट्रेलियन दांपत्याने घेतले विशालकाय पानकोबीचे पीक; म्हणाले, आमचा हा प्रयोग अनुकूल वातावरणामुळे यशस्वी ठरला