आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतुकीचे नियम तोडल्याने लोकांना उठाबशा काढायला लावणारा पोलिस निलंबित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोध्रा - गुजरातमध्ये नवा मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पोलिस वाहनचालकांशी सौजन्याने वागले. लोकांना गुलाबाचे फूल देऊन वाहतुकीचे नियम पालन करण्याबाबत समज दिली. परंतु गोध्रा येथे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या तिघा स्वारांना कान पकडून उठाबशा काढायला लावल्या. परंतु हे कृत्य अशोभनीय असल्याचा ठपका ठेवत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सहायक फौजदार एम. एल. डामोर यास निलंबित केले. सहायक फौजदाराच्या अशा वर्तनामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होते, असे पाेलिस अधीक्षक डॉ. लीना पाटील म्हणाल्या.