आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Police Has Came To Sonakshi's House For Investigate, Sonakshi Explains, "They Want To Make Money By Spoiling My Image"

सोनाक्षीची तपासणी करण्यासाठी पोहोचले यूपी पोलीस, स्पष्टीकरण देताना सोनाक्षी म्हणाली - 'ते माझी प्रतिमा खराब करून पैसे कमावू इच्छितात'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : यूपी पोलीस गुरुवारी सोनाक्षी सिन्हाची तपासणी करण्यासाठी मुंबई येथील तिच्या घरी पोहोचला होता. मिळालेल्या माहितीनुसार, एका इव्हेंटमध्ये परफॉर्मन्ससाठी तिला 37 लाख रुपये मिळाले होते पण ती या आयोजनाच्या ठिकाणी पोहोचली नाही. याप्रकरणी मार्च 2019 मध्ये अलाहबाद हायकोर्टात जज नाहीद. आर. मोनीस आणि व्ही.के.श्रीवास्तवने सोनाक्षीचे वकील इम्रान उल्लाहचे म्हणणे ऐकून आरोप पत्र दाखल होईपर्यंत अटकेवर निर्बंध लावले होते. 

 

सोनाक्षीने दिले स्पष्टीकरण...  
सोनाक्षीने याप्रकरणी ट्विटरवर एक पोस्ट करून स्पष्टीकरण दिले आहे. सोनाक्षीने लिहिले, "एक आयोजक जो आपल्या प्रतिबद्धतेवर खरा उतरू शकला नाही, तो विचार करतो की, तो प्रेसमध्ये माझी चांगली प्रतिमा खराब करून पैसे कमावू शकतो."

 

 

हे होते प्रकरण... 
मुरादाबादमध्ये काही दिवसांपूर्वी सोनाक्षी सिन्हासह पाच लोकांविरुद्ध 37 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली गेली होती. आरोप होते की, सोनाक्षी अडव्हान्स पेमेंट घेतलेले असूनही दिल्लीमध्ये शोसाठी आली नाही. आयोजक प्रमोद शर्माने पोलिसांकडे तक्रार केली होती, पण आरोपींविरुद्ध काहीही कारवाई केली जात नाहीये. यामुळे दुखी होऊन प्रमोदने 13 फेब्रुवारीला विष घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केला. 

 

5 लोकांवर झाला होता आरोप... 
कटघर भागातील शिवपुरी गावातील प्रमोद शर्माने मागच्यावर्षी 24 नोव्हेंबरला मुरादाबादच्या एसएसपीकडे सोनाक्षी सिन्‍हाविरुद्ध तक्रार केली होती. सोनाक्षीला दिल्लीमध्ये 30 सप्टेंबरला इंडिया फॅशन अँड ब्यूटी अवाॅर्डमध्ये प्रस्तुती द्यायची होती. तपासानंतर सोनाक्षी, टॅलेंट फुल ऑन कंपनीचा अभिषेक सिन्हा, मालविका पंजाबी, धूमिल ठक्कर आणि एडगर सकारियाला IPC ची कलम 406 आणि 420 नुसार आरोपी बनवले गेले आहे.