Home | Maharashtra | Vidarva | Akola | Police have to do hard work for Form 16

फॉर्म १६ साठी पोलिसांची दमछाक; ६०० रुपये देऊनही मारतात चकरा !

दिलीप ब्राम्हणे | Update - Aug 31, 2018, 12:24 PM IST

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी १६ नंबरचा फॉर्म भरणे आवश्यक आहे. हा फॉर्म यापूर्वी पोलिस अधीक्षक कार्यालयातूनच मिळत होता.

 • Police have to do hard work for Form 16

  अकोला- इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी १६ नंबरचा फॉर्म भरणे आवश्यक आहे. हा फॉर्म यापूर्वी पोलिस अधीक्षक कार्यालयातूनच मिळत होता. मात्र यंदा पोलिसांना बाहेरूनच त्याची पूर्तता करावी लागत आहे. २०० रुपयांच्या कामासाठी मात्र ५०० ते ६०० रुपये मोजावे लागत असून पोलिसांच्या खासगी व्यक्तींकडील चकरा वाढल्या आहेत. याचा परिणाम पोलिसांच्या कामकाजावर होत असून, ग्रामीण भागातील पोलिसांसह शहरातील दोन हजार ८०० पोलिसांची मात्र डोकेदुखी वाढली आहे.


  नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी १६ नंबरचा फॉर्म भरावा लागतो. ही प्रक्रिया पोलिस अधीक्षक कार्यालयातील संबंधित आस्थापना विभागाने राबवणे क्रमप्राप्त आहे. मात्र यंदा सर्वच कर्मचारी बाहेर विधीतज्ज्ञांकडे चकरा मारताना दिसून येत आहे. १०० रुपये फॉर्मसाठी आणि ५०० रुपये प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मोजावे लागत असल्याने अनेक कर्मचारी खासगीत संताप व्यक्त करीत आहेत. जर अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्या जात असतील तर ती कर्मचाऱ्यांची लूटच आहे. म्हणून त्यावर प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही हे लक्षात घेता प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी आस्थापना विभागाला तसे आदेश गुरुवारी संध्याकाळी दिले.


  ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना त्रास
  ग्रामीण भागात कार्यरत असलेल्याकर्मचाऱ्यांना या प्रक्रियेचा मोठा त्रास सहन करावा लागतो. रात्रपाळीतील ड्युटी संपल्यानंतर दिवसभर त्याला रांगेत उभे राहून परिणामी चकरा मारून इन्कम टॅक्स रिटर्नसाठी १६ नंबरचा फॉर्म भरताना त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.


  उपविभागनिहाय प्रक्रिया राबवू
  पोलिस कर्मचाऱ्यांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेतो. यापुढे पोलिस अधीक्षक कार्यालयात तसेच उपविभागनिहाय मंडप टाकून, तेथेच विधीतज्ज्ञांना बोलावून त्यांच्याकडून याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
  - एम. राकेश कलासागर , पोलिस अधीक्षक.

Trending