आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोहत्या..गोवंश तस्करांशी यावल पोलिसांचे साटेलोटे..कत्तल त्वरीत थांबवा, समस्त हिंदुत्त्ववादी संघटनांची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- महाराष्ट्रात गोहत्याबंदी कायदा लागू झाला असतानाही यावल तालुक्यात गोहत्या, गोवंश तस्करी सर्रास सुरु आहे. एवढेच नाही तर गाेवंश तस्कराशी पोेलिसांचे साटेलोटे असल्याचा आरोप समस्त हिंदूत्ववादी संघटनेने केला आहे. गोहत्या आणि गोवंश त्वरित बंद करावी, या मागणीचे निवेदन शहरातील समस्त हिंदुत्त्ववादी संघटनाच्या वतीने निवासी नायब तहसिलदार आर.के. पवार यांना देण्यात अाले.

 

गुरांचे वाहन रोखणाऱ्यांवरच पोलिसांची कारवाई, नागरिकांमधून संताप

गोवंश वाहून नेणारे वाहन रोखणार्‍यांवरच गेल्या आठवड्यात यावल पोलिसांनी कारवाई केली होती. एका तरुणावर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे. एकूणात या प्रकरणी पोेलिसांचे गाेवंश तस्कराशी साटेलोट असल्याचा आरोप हिंदुत्त्ववादी संघटनेने केला आहे.

 

चोपडा रस्त्यावरून शुक्रवारी (ता.8) वाहनातून (एम.एच. 20 बी.टी. 3188) गोवंशाची बेकायदा वाहतूक केली जात असल्याचे काही जागृत तरुणांच्या लक्षात आले. त्यांनी वाहन थांबवून पोलिसांना माहिती देण्यात आली. तरुणांची आवश्यक कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी ती पूर्ण केली नाही. वाहन चालक व तरुणांमध्ये बाचाबाची झाली. घटनास्थळी पोलिस पोहोचले. पोलिस वाहन चालल आणि काही तरुणांना पोलिस स्टेशनला आणत असताना बाजारातील गर्दीचा फायदा घेत चालक गुरे भरलेले वाहन घेऊन पसार झाला. पोलिसांनी गोवंश तस्करी करणार्‍या वाहनाचा शोध न घेता वाहन रोखणार्‍या तरुणांवरच कारवाई केली. दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी गोवंश वाहतुकीची कागदपत्रे नसलेले वाहन सोडले कसे? यात पोलिस प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का ? अथवा प्रशासनातील काही अधिकार्‍यांचे गोतस्करांशी साटेलोटे आहे का ? असा सवाल उप उपस्थित करण्यात येत आहे. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर, सेनेचे जिल्हा उपप्रमुख मुन्ना पाटील, नामदेव कोळी, चेतन भोईटे, अविनाश बारसे, उज्ज्वल कानडे, अमोल पाटील, मयुर पाटील, प्रवीण बडगुजर, प्रदीप पाटील, अक्षय बारी, सुधाकर धनगर नितिन बारीसह मोठ्या संख्येत पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

समस्त हिंदुत्त्ववादी संघटनेच्या या आहेत मागण्या..
तालुक्यात चालणारे अवैध कत्तलखाने बंद करावेत, गोवंशियांची कत्तल थांबवावी, कत्तल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, गोवंशियांची तस्करी रोखावी, तसेच तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, 8 मार्चच्या घटनेतील पसार झालेल्या गाडीच्या मालक तसेच संबंधित यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व वरील प्रकरणात कर्तव्यात कसूर ठेवणार्‍या पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.

 

कुणी कायदा हातात घेवु नये.
याबाबत निवेदन देेताना पोलिस निरिक्षक देखील तहसिल कार्यालयात आले. त्यांच्यावरही शुक्रवारच्या घटनेत  दिरंगाई केल्याबाबत ताशेरे ओढण्यात आले. शहरात गोहत्या, गोवंश तस्करी करताना आढळून आल्यास पोलिसांना कळवावे. कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलिस निरिक्षक डी.के.परदेशी यांनी  केले आहे.

 

सौहार्दपूर्ण वातावरण रहावे...
पोलिसांच्या अशाप्रकारे बेजबाबदार व संशय निर्माण करणाऱ्या कारवाईमुळे तरूणांमधून संताप व्यक्त होत आहे परिणामी शहरातील सौहार्दपूर्ण वातावरण दूषित होऊन मने दुखावली गेली आहेत, असे देखील निवेदनात हिंदुत्त्ववादी संघटनेने नमूद केले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...