आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- येथील 51 वर्षीय पोलिसांच्या खबरीला 1.41 कोटी रुपयांचे हेरोइन नावाचे ड्रग्स बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केले. यावरुन मुंबईतील अँटी नारकोटिक्स सेल(एएनसी) ने पोलिसांचे खबरी आणि ड्रेग्स तस्करांमध्ये संबंध असल्याचे सांगितले आहे.
अँटी नारकोटिक्स सेलने ठाण्यातील खालिद वसी खान नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे वरळी पोलिसातील नारकोटिक्स विभागाने दक्षिण मुंबईतील डॉक यार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापळा रचून खालिदच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून पोलिसांना 1.41 कोटी रुपयांचे 470 ग्राम हेरोइन जप्त केले. पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर आले की, खालिद खान हा 2000 ते 2003 दरम्यान नारकोटिक्स विभागाचा खबरी म्हणून काम करायचा.
याआधीही खालिदला त्याच्या काही मित्रांसह गांजाची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. पण, त्याच्याविरुद्ध काही पुरावे नसल्याने त्याला सोडून देण्यात आले. तसेच, खान ड्रग तस्करांकडून ड्रग्स घेऊन ते दुसऱ्या क्लायंट्सना पुरवत असल्याचेही समोर आले आहे. सध्या त्याच्याविरोधात ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायदा 1985 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.