आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलंदशहर हिंसाचारात इन्स्पेक्टर सुबोधच्या हत्येमध्ये लष्कराच्या जवानावर संशय, SIT जम्मूला रवाना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलंदशहर - इन्सपेक्टर सुबोध सिंह यांच्या हत्ये प्रकरण युपी पोलिसांना एका लष्करी जवानावर संशय आहे. पोलिस घटनेतील त्याची भूमिका तपासत आहेत. पोलिस प्रवक्त्यांनी सांगितले की, एका व्हायरल व्हिडिओमध्ये जीतू नावाचा जवान कट्ट्यासह दिसत आहे. तो घटनास्थळी होता आणि घटनेनंतर जम्मूला युनिटकडे रवाना झाला असा संशय आहे. युपी पोलिसांची SIT लष्करी अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर जम्मूला रवाना झाली आहे. 


स्याना परिसरातील चिंगरावठी गावात 3 डिसेंबरला झालेल्या हिंसाचारात इन्स्पेक्टर सुबोध आणि गावातील तरुण सुमितचा मृत्यू झाला होता. 


एफआयआरमध्येही जवानाचे नाव 
पोलिसांनी सांगितले की, आरोप असलेल्या लष्करी जवानाचे नाव एफआयआरमध्येही आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये लष्करी जवानाकडे कट्टा असल्याचे दिसून आले आहे. याच व्हिडिओच्या आधारे पोलिस तपास करत आहेत. गुरुवारी रात्री पोलिसांनी या जवानाच्या चिंगरावठीमधील घरी झडती घेतली. 

 
गोतस्करीच्या संशयामुळे भडकला हिंसाचार 
बुलंदशहर येथे सोमवारी गोतस्करीच्या मुद्द्यावरून हिंसाचार पसरला होता. याचे नेतृत्व बजरंग दलाचे नेते योगेश राज यांनी याचे नेतृत्व केले होते. पोलिसांनी दोन एफआयआर दाखल केले आहेत. पहिली एफआयआर योगेश यांच्या तक्रारीवरून गोतस्करीची दाखल केली. त्यात सात जणांची नावे आहेत. तर दुसऱ्या एफआयआरमध्ये हिंसाचार आणि इन्स्पेक्टरच्या हत्येचा गुन्हा दाखल आहे. त्यात 27 जणांची नावे आहेत तर 60 अज्ञातांचा समावेश आहे. आतापर्यंत चौघांना अटक झाली आहे. तर चौघांना ताब्यात घेतले आहे. 


माझ्या मुलाने गोळी घातली असेल तर त्याला गोळी घाला 
आरोपीच्या आईने पोलिसांवर तपासाच्या नावाखाली घरात गोंधळ घातल्याचा आरोप केला आहे. तसेच घरातील महिलांबरोबर गैरवर्तन केल्याचेही म्हटले आहे. माझ्या मुलाने इन्सपेक्टरला गोळी घातली असेल तर त्याला गोळी घाला असे त्यांनी म्हटले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...