आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Police Inspector Hands Over Challan To His Own Father For Breaking Traffic Rule, Video Goes Viral

या प्रामाणिक पोलिस निरीक्षकाचे सर्वत्र होतेय कौतुक; ड्युटी बजावताना वडिलांनाही सोडले नाही, कॅमऱ्यात टिपली संपूर्ण घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - काही भ्रष्ट कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमुळे अख्ख्या पोलिस डिपार्टमेंटला दोष दिला जातो. परंतु, सगळेच पोलिस सारखे नसतात असे उदाहरण मध्य प्रदेशातील एका पोलिस अधिकाऱ्याने प्रस्तुत केले आहे. त्याच्या जबाबदारवृत्ती आणि प्रामाणिकपणाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. उमरिया जिल्ह्यात एका ठिकाणी ड्युटीवर असताना सुबेदार अखिल सिंह यांनी आपल्या वडिलांनाही सोडले नाही. अगदी सामान्य नागरिकासारखी वागणूक देत त्यांचे वाहन अडवले. तसेच समज देऊन चालान देखील कापला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात टिपली असून त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.


साहेब... कारमध्ये आपले वडील आहेत! 
पोलिस निरीक्षक अखिल सिंह उमरिया जिल्ह्यात चेकिंग पॉइंटवर थांबले होते. त्यांच्या कनिष्ठ सहकाऱ्यांनी एक कार अडवली. कारच्या खिडक्यांवर लावलेल्या काचांवर काळ्या फिल्म होत्या. ही गोष्टी बेकायदेशीर असून आता दंड भरावाच लागेल असा आग्रह पोलिस कर्मचाऱ्यांनी धरली. पोलिस शिपायांनी कारची काच खाली उतरवली तेव्हा त्यांना गाडीमध्ये आपले साहेब अखिल सिंह यांचे वडील दिसून आले. ही गोष्ट त्यांनी सुबेदार अखिल सिंह यांच्या निदर्शनास आणून दिली. गाडीत आपले वडील बसलेला असतानाही त्यांनी कुठल्याही प्रकारचे भेदभाव केला नाही. त्यांनी फक्त कारच्या काळ्या फिल्म्स उतरवल्या नाहीत, तर 500 रुपये दंडाची पावती सुद्धा दिली. ही घटना घडली तेव्हा अखिल यांचे वडील आरबी सिंह आपल्या नातवंडांची भेट घेण्यासाठी निघाले होते. पोलिस अधिकाऱ्याची कर्तव्यदक्षता पाहून नेटिझन्स त्यांचे तोंडभर कौतुक करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...