आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बीड- एक पोलिस दुसऱ्या पोलिसाविषयी फारसे चांगले बोलताना दिसत नाही. सेवानिवृत्तीचा निरोप देऊन मिरवणूक काढणे हा विषय तर दूरच. परंतु असाच आश्चर्यचकीत करणारा प्रसंग माजलगाव येथे पोलिस व नागरिकांनी अनुभवला आहे. माजलगाव येथील पोलिस निरीक्षक मिर्झा बेग यांना सहकारी पोलिसांनी वाजतगाजत मिरवणूक काढून निरोप देण्यात आला. मिर्झा बेग हे पोलिस दलातून 31 डिसेंबर 2018 रोजी सेवानिवृत्त झाले. बीड जिल्ह्यात 12 वर्षे उत्तम कामगिरी करून खाकीची मान उंचावणारे मिर्झा बेग यांच्या निरोपाच्या वेळी मनोगत व्यक्त करतांना पोलिसांना अश्रु अनावर झाले. विशेष म्हणजे परळी येथील स्त्री भ्रूण हत्येतील मुख्य आरोपी डॉ.सुदाम मुंडे याला बेड्या ठोकण्यात मिर्झा बेग यांचा मोठा वाटा होता.
पोलिस दलात जवळपास 34 वर्षे सेवा देणारे पोलिस निरीक्षक मिर्झा बेग हे 19 जानेवारी 2018 रोजी माजलगाव ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षक म्हणून रूजू झाले होते. त्यांनी माजलगाव ग्रामीण पोलिस स्टेशन ऑनलाईन करून जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवला होता. तिथे पोलिस दलाची मान उंचवण्याचे काम केले. विशेष म्हणजे स्त्री भ्रूण हत्येतील आरोपी डॉ. सुदाम मुंडे याला गजाआड करण्यात बेग यांचा मोठा वाटा आहे. जिथे नोकरी केली तिथल्या आपल्या सहकाऱ्यांसोबत आणि नागरिकांसोबत सुद्धा चांगला संवाद ठेवला.
31 डिसेंबर रोजी पोलिस निरीक्षक मिर्झा बेग हे सेवानिवृत्त होत असल्याने माजलगाव ग्रामीण पाेलिस वसाहत येथे दुपारी चार वाजता निरोप सभारंभाचे आयोजन केले होते. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून माजलगाव विभागाच्या उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार, तहसिलदार एन.जी.झंपलवार, माजलगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बापुसाहेब महाजन, पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे, पोलिस उपनिरीक्षक विकास दांडे आदी उपस्थित होते. निरोप समारंभ होताच कार्यक्रमाच्या ठिकाणी फुलांनी सजवलेल्या एका उघड्या जीपमध्ये पोलिस निरीक्षक मिर्झा बेग यांच्यासह पोलिस निरीक्षक सुरेश बुधवंत उभे राहिले. शहरातील पोलिस कॉलनीतील गार्डनला फेरी मारून जीप थेट पोलिस स्टेशन परिसरात पोहोचली त्यांनतर पोलिस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी पदभार स्विकारला. मिर्झा बेग हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील असुन मागील 12 वर्षांपासून बीड जिल्ह्यात कार्यरत होते.
पोलिसांनी वर्गणी करून दिला निरोप
माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मिर्झा बेग एक माणुसकी जपणारे अधिकारी असल्याने दोन दिवसांपासून पोलिस त्यांच्या निरोपाची तयारी करत होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वर्गणी 57 हजार रूपयांची वर्गणी निरोप समारंभाच्या खर्चाचे नियोजन केले. कार्यक्रमातच पोलिस निरीक्षक बेग दाम्पत्याचे स्वागत केले. मिर्झा हे पोलिस खात्यात भरती झाल्यापासून त्यांचा पोलिस निरीक्षकापर्यंतचा कसा प्रवास राहिला याचे लिखित वर्णनाची फोटो फ्रेम करून त्यांना भेट दिली. मिर्झा यांच्या आठवणी सांगतांना पोलिस धोंडीराम मोरे व पोलिस राऊत यांना अश्रु आनावर झाले.
पोलिस खात्याची मान उंचावण्याचे काम केले
आपल्या 34 वर्षात पोलिस खात्यात सेवा बजवणारे पोलिस निरीक्षक मिर्झा बेग यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केले तेथे पोलिस खात्याची मान उंचवण्याचे काम केले.आसल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत सामाजिक सलोखा जपला. यामुळे त्या त्या ठिकाणी लोकप्रिय अधिकारी म्हणून परिचित झाले असल्याचे मत उपविभागिय अधिकारी प्रिंयका पवार कार्यक्रमाप्रसंगी सांगीतले.
तीनशे पोलिसांची जेवनाची व्यवस्था
माजलगाव येथील ग्रामीण पाेलिस वसाहतीत पोलिस निरीक्षक मिर्झा बेग यांच्या निरोप समारंभानंतर पोलिसांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. या जेवणात बैगन मसाला, भेंडी मसाला, जिलेबी, जिरा रायस व चपाती असा मेनू होता.
आदरयुक्त भीती होती
पोलिस दलात प्रत्येकाला काम करताना अनेक अडचणी येतात. पोलिस निरीक्षक मिर्झा बेग प्रत्येक अडचणीवर तोडगा काढत असत. स्टेशनमधील प्रत्येक पोलिस सहकार्यासोबत मिर्झा यांनी मैत्रीचे नाते निर्माण केले आहे. त्यांच्या बरेाबर काम करत असतांना पोलिसांना कधीच भीती किंवा दहशत वाटली नाही तर आदरयुक्त भीती असायची.
- राजेंद्र ससाणे, पोलिस नाईक, माजलगाव ग्रामीण
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा.. कर्तव्यदक्ष पोलिस अधिकार्याला निरोप देण्यासाठी माजलगावात निघालेल्या मिरवणुकीचे फोटो..
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.