आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅफिक चेकिंग दरम्यान पोलिस उपनिरीक्षकाने धरला तरुणीचा हात; गैरवर्तनाचा व्हिडिओ व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फतेहाबाद- ट्रॅफिक चेकिंग करताना एका पोलीस उपनिरीक्षकाने बाइकजवळ असलेल्या तरुणीसोबत गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे. उपनिरीक्षकाने आपल्या अधिकाराचा चुकीच्या पद्धतीने वापर करत  बळजबरीने तरुणीचा हात धरला. त्यानंतर जबरदस्तीने तिच्या हातातून बाइकची चावी हिसकावून घेतली. तरुणीने हा सर्व प्रकार वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. इंद्राज असे या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून पोलिस याप्रकरणी योग्य ती कारवाई करणार असल्याचे मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितले.    


तरुणीच्या वडिलांनी सांगितनुसार, ते आपल्या दोन मुलींसोबत बाजारात गेले होते. दरम्यान त्यांनी रस्त्याच्या कडेला मोटरसायकल उभी करुन बाजारात असता इंद्राज आपल्या टीमसोबत तिथे पोहचला. इंद्राज तिथे पोहचल्यानंतर रस्त्याच्या कडेवर उभी असलेली मोटरसायकल चोरीची असल्याचा दावा करत मुलीशी गैरवर्तन करु लागला. मुलीने जाब विचारला असता इंद्राजने तिच्या हातून चावी हिसकवण्याचा प्रत्यन केला. दरम्यान तिथे असलेल्या एका व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद केला असून तो व्हायरल केला. 

 

पोलिस याप्रकरणी संबंधित उपनिरीक्षकाची चौकशी करणार असून दोषीवर योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती डीएसपी उमेद सिंग यांनी दिली आहे.     

 

बातम्या आणखी आहेत...