आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Police Man Get Arrested In The Case Of Taking A Bribe

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाळूचा ट्रक गावातून जाऊ देण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना पोलिस पाटील जाळ्यात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- वाळूचा ट्रक गावातून जाऊ देण्यासाठी महिन्याला तलाठी व स्वत:साठी पैशांची मागणी करून पाच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या गंगापूर तालुक्यातील पोलिस पाटलास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहाथ पकडले.

 
संतोष मच्छिंद्र गायके (३५, रा. नेवरगाव, ता. गंगापूर) असे आरोपीचे नाव आहे. वाळू व्यावसायिकाला त्याचा वाळूचा ट्रक गावातून न्यायचा होता.त्यासाठी पोलिस पाटलाने व्यावसायिकाकडे दहा हजारांची मागणी केली. तसेच तलाठ्याला महिना ५० हजार रुपये द्यावा लागतो, असे म्हणून त्यांच्या नावाचा देखील हप्ता मागितला. ३० डिसेंबर २०१८ रोजी घडलेल्या या प्रकरणाची व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी पडताळणी केली असता पोलिस पाटील पाच हजार रुपयात तयार झाल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार सापळा रचून गुरुवारी नेवरगावात वाळू व्यावसायिकाकडून पाच हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गायकेला रंगेहाथ ताब्यात घेतले.

पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गणेश धोकरट , जमादार विजय बाम्हंदे, पोलिस नाईक गोपाल बरंडवाल, सुनील पाटील, मिलिंद ईप्पर यांनी ही कारवाई केली.