आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकरण मिटविण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेल्या युवकाला पोलिसांनी केली मारहाण, मार खाणाऱ्याने स्वतःची ओळख सांगताच पोलिसांना फुटला घाम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


व्हिडिओ डेस्क : उत्तर प्रदेशच्या आझमगड येथे एका पोलिस अधिकाऱ्याने हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. संबंधित पोलिस अधिकारी फरिहं पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी निजामाबाद पोलिस ठाणे क्षेत्रात दोन गटांत मारहाण होत होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही गटांना ताब्यात घेऊऩ पोलिस ठाण्यात आणले.

 

दरम्यान दोन्ही गटांमध्ये मध्यस्ती करण्यासाठी युवा वाहिनीचा कार्यकर्ता सुरेंद्र यादव तेथे दाखल झाला. या गोष्टीचा राग आल्याने पोलिस अधिकारी माखन सिंहने सुरेंद्र यादवला मारहाण केली. सुरेंद्र यादवने आपली ओळख सांगताच पोलिसांनी त्याची माफी मागितली आणि हे प्रकरण मिटविण्यास सांगितले. दरम्यान संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिस प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी मौन स्वीकारले आहे.  

बातम्या आणखी आहेत...