आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केज - पोलिस जमादाराने आपल्याच ठाण्यातील सहकारी पोलिसांच्या प्रवास भत्त्यासह साप्ताहिक सुट्टी भत्ता व गणवेश अनुदानाच्या रकमेवर डल्ला मारला आहे. कुंपणानेच शेत खाल्ल्याचा हा प्रकार असून या जमादाराने सहकारी पोलिसांचा भत्ता आणि अनुदानासाठी आलेले चार लाख १९ हजार ४०९ रुपये वाटप न करता स्वत: गिळंकृत केल्याचा प्रकार डीवायएसपींच्या चौकशीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी युसूफवडगाव पोलिस ठाण्यातील तत्कालीन जमादार सुधाकर दौंड यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस खात्याकडून पोलिस कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रवास, साप्ताहिक सुट्टी भत्ता आणि गणवेश खरेदी अनुदानाची रक्कम जमादार सुधाकर जालिंदर दौंड याने कर्मचाऱ्यांना वाटप न करता परस्पर हडप केली. दौंड याने १ ऑगस्ट २०१५ ते दि. ३१ मे २०१८ दरम्यान ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता, साप्ताहिक सुट्टी बिल आणि गणवेश अनुदानापोटीची रक्कम ठाण्याकडे जमा झालेली असताना संबंधित कर्मचाऱ्यांना वाटप न करता ४ लाख १७ हजार ४०९ रुपये परस्पर हडप केले. दौंड हा सध्या धारूर ठाण्यात कार्यरत असून त्याच्याविरुद्ध शासकीय रकमेचा अपहार व फसवणूक केल्याप्रकरणी ठाण्याचे सपोनि आनंद झोटे यांच्या तक्रारीवरून युसूफवडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तपास सपोनि आनंद झोटे करत आहेत.
डीवायएसपींच्या चौकशीत प्रकार उघड
केजचे एसडीपीओ अशोक आम्ले यांनी सखोल चौकशी केली. यात दौंड याने १ ऑगस्ट २०१५ ते दि. ३१ मे २०१८ या कालावधीत युसूफवडगाव ठाण्यात कार्यरत पोलिसांचा प्रवास भत्ता, साप्ताहिक सुट्टी बिल आणि गणवेश अनुदानापोटीची रक्कम ठाण्याकडे जमा झालेली असताना संबंधित कर्मचाऱ्यांना वाटप न करता चार लाख १७ हजार ४०९ रुपयांच्या रक्कमेचा अपहार केल्याचे उघडकीस आले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.