आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस अधिकाऱ्याची पत्नीच निघाली कॉलगर्ल; पैसा नव्हे मौज-मजेसाठी करायची देहविक्रय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - इंग्लंडमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका पत्रकाराने हायप्रोफाईल कॉलगर्ल्स आणि हॉटेलांमध्ये चालणाऱ्या देहविक्रयाचा भांडाफोड केला. त्यामध्येच एका महिलेला अटकही करण्यात आली. परंतु, ती महिला चक्क एका वरिष्ठ अधिकाऱ्याची पत्नी निघाली आहे. विशेष म्हणजे, आपल्या वयाच्या तिशीत असलेली ही विवाहिता गेल्या 10 वर्षांपासून एक कॉलगर्ल म्हणून देहविक्रय करत होती. परंतु, तिच्या पोलिस अधिकारी पतीला याचा काहीच पत्ता नव्हता. स्टिंग ऑपरेशनमध्ये खुलासा झाला नसता तर तिचे सत्य कधीच पती आणि जगासमोर आले नसते.


पैश्यांसाठी नव्हे मौज-मजेसाठी बनली कॉलगर्ल
लंडनच्या पोलिस विभागात मोठ्या पदावर असलेल्या एका अधिकाऱ्याची पत्नी स्टिंग ऑपरेशनमध्ये देहविक्रय करताना पकडली गेली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन नाव आणि कुटुंबाची माहिती घेतली. तेव्हा त्यांना ती आपल्याच विभागातील बड्या अधिकाऱ्याची पत्नी असल्याचे कळाले. आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्याची पत्नी पोलिस स्टेशनला अटक करून आणली आणि तिच्यावर देहविक्रयाचे आरोपही लागले. पण, आपल्या वरिष्ठाला आणि तिच्या पतीला ही गोष्ट सांगावी तरी कशी असा प्रश्न त्यांना पडला होता. तिला कॉलगर्ल होण्याचे कारण विचारले तेव्हा दुसरा धक्का बसला. आपण पैसे कमविण्यासाठी हे काम करत नाही, तर केवळ मौज मजेसाठी करत आहोत अशी कबुली तिने दिली. एवढेच नव्हे, तर आपल्या कामाबद्दल पश्चाताप नसल्याचेही तिने सांगितले.


मग पतीने केली ही कारवाई...
हीच माहिती जेव्हा पोलिसांनी तिच्या पतीला दिली तेव्हा पतीच्या पायाखालची वाळूच सरकली. आपण ज्या सुंदर आणि सुशील महिलेसोबत पती म्हणून राहतोय तिची प्रत्येक मागणी पूर्ण करतोय ती कॉलगर्ल निघेल याचा त्याने विचारही केला नव्हता. पीडित पतीने आपल्या पत्नीला सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच आपल्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पत्नीच्या विरोधात अधिकृत तक्रार दाखल केली. सोबतच, पोलिसांना तिच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...