आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Police Officers Are Being Trained To Nab Perpetrators Sharing Indecent Content On Apps

सावधान...WhatsApp वर पॉर्न सेंड केल्यास पोलिस करणार अटक, देशभरातील पोलिसांना देण्यात येत आहे प्रशिक्षण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली : आपणही मेसेजिंग अॅपवर बिंधास्तपणे अश्लील मजकूर शेअर करत असाल तर वेळीच सावध व्हा. अन्यथा तुम्हाला अटक करण्यात येऊ शकते. अशा प्रकारच्या चुका कायद्याच्या दृष्टीने अपराध असतात. यामुळे यावर अंकुश लावण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. मेसेजिंग आणि शॉर्ट व्हिडिओ अॅप्सवर शेअर करण्यात येणार आपत्तीजनक मजकूरावर लगाम लावण्यासाठी पोलिस तांत्रिक गोष्टींचे प्रशिक्षण घेत आहेत. हे मेसेजिंगल अॅप्स आणि शॉर्ट व्हिडिओ अॅप्स मुलांसाठी पॉर्नोग्राफिकसाठी ग्रूम करण्याचे काम करते. यामध्ये मुलांकडे अश्लील मजकूर शेअर केला जातो. याशिवाय इतर प्रकराचा आपत्तीजनक मजकूर शेअर केला जातो.  बहुतांश लोक  पॉर्नोग्राफिक मजकूर शेअर करण्यासाठी वॉट्सअपसारख्या इंक्रिप्टेड प्लॅटफॉर्मचा वापर करतात. अशात अशा गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे पोलिसांसाठी एक आव्हानच असते. पण आता या गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिस देखील सावध होती आहेत.  मेसेजिंग अॅपवर पॉर्नोग्राफिक कंटेटचे प्रसारण रोखण्यसाठी देशभरातील पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या वाढत्या गोरखधंद्याला चपराक बसविण्यसाठी पोलिस सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट्सकडून पूर्णपणे प्रशिक्षण घेणार आहे.

 

अशाप्रकारे देण्यात आहे प्रशिक्षण

गृहमंत्रालयाच्या मते, एखाद्या रजिस्टर्ड नंबरवरून एखाद्या एडमिनिस्ट्रेटरला कसे ट्रेस करता येईल आणि कॉल्स करण्यासाठी वर्चुअल मोबाइल नंबर कशाप्रकारे मिळवता येईल याबाबतचे पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. पोलिसांसाठी महिन्यातून दोन-तीन वेळा एका तासाचे अशाप्रकारचे सेशन ठेवण्यात येते. तंत्रज्ञानाचे योग्य ते ज्ञान नसल्याने अशाप्रकारच्या अपराध्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश येते. यामुळे आता सायबर सिक्योरिटीची मदत घेण्यात येत आहे. 

 

वॉट्सअपवर ट्रेस करणे असते अवघड 
वॉट्सअप आणि इतर मेसेजिंग अॅपवर रिवेन्ज पॉर्न, चाइल्ड पॉर्न आणि इंटीमेंट फोटो शेअर करण्यात येतात. या अॅपमधील मजकूर थांबविण्यासाठी कोणतीही मशिनरी नसते. असे मजकूर पर्सन-टू-पर्सन बेसिसवर किंवा ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करून शेअर करण्यात येतात. यामुळे लोकांना ट्रेस करणे जिकरीचे होते. यामधील बहुतांश कंटेट हा पैसे कमविण्यासाठी युझर स्वतः तयार करतो आणि विकतो. चाइल्ड पॉर्नोग्राफी आणि बाल शोषणचे केसेस ह्या ग्रामीण भागातून दाखल करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच वॉट्सअपमध्ये सिक्योरिटीसाठी देण्यात सिक्योरिटी चेक्समुळे गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे आणखीनच कठीण झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...