Home | Divya Marathi Special | police-physical-strength-issue

ढेरपोटे पोलीस घामाघूम

अभिषेक चौबे - रांची | Update - May 25, 2011, 11:46 AM IST

राजधानी येथील महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या जवानांची शारीरिक चाचणी घेतली असता त्यांचे बिंग फुटले.

 • police-physical-strength-issue

  रांची - राजधानी येथील महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या जवानांची शारीरिक चाचणी घेतली असता त्यांचे बिंग फुटले. सरकारने घेतलेल्या या चाचणीत कोणाला धाप लागली, तर कोणी लडखडत होता, कोणी म्हणत होता नेहमी साहेबांच्या मागे राहावे लागते मग पळायला वेळ कोठे मिळतो. काही अंगरक्षकांनी अतिशय सहजतेने निर्धारित केलेली सीमारेषा गाठली, पण बाकी सर्व अंगरक्षक घामाघूम झाले. त्यांनी कशीबशी सीमारेषा पार केली आणि जमिनीवर लोळण घेतली. या जवानांपैकी 20 टक्के येथेच नापास ठरले. ज्या अधिका:यांनी त्यांची नेमणूक केली त्यांनी कोणत्या मार्गाने यांना नियुक्त केले होते ते त्यांनाच माहीत. जर त्या अधिका:यांनी सूट दिली नसती तर 50 टक्के जवान येथे पास तरी नक्की झाले असते.

  पळण्याच्या आणि लांब उडीच्या शर्यतीत अयशस्वी झालेल्या अंगरक्षकांच्या नावांची यादी वेगळी तयार केली आहे. यशस्वी झालेल्या जवानांना अजून फायरिंग आणि मेडिकल चाचणी पार करायची आहे.


  फेरीत 25 अंगरक्षक बाहेर
  आठ मिनिटांत 1600 मीटर पळण्याची शर्यत तुम्हाला पूर्ण करायची असून पळताना जर कोणी ट्रॅकच्या बाहेर गेला तर त्याला शर्यतीच्या बाहेर करणार. यानंतर तुम्हाला 12 फूट लांब उडीमध्ये भाग घ्यायचा आहे. पळण्याच्या शर्यतीनंतर लगेचच लांब उडीची स्पर्धा घेण्यात येणार आहे. अशा सूचना शारीरिक चाचणी घेणा:या अधिका:यांनी अंगरक्षकांना दिल्या. 249 अंगरक्षकांपैकी 25 अंगरक्षक चाचणीतून बाहेर झाले.

  अंगरक्षक 32 वर्षांनंतर पळाला
  लोकायुक्त अमरेश्वर सहाय यांचा अंगरक्षक बीआर तिवारी जवळजवळ 32 वर्षांनंतर अशा प्रकारच्या पळण्याच्या शर्यतीत पळत होता. त्याने सांगितले की, ही पळण्याची शर्यत मी कधीच विसरू शकणार नाही. या शर्यतीत मागे राहिल्यानंतर 52 वर्षीय अंगरक्षकाने फक्त पळण्याची शर्यतच पार केली नाही तर लांब उडी देखील यशस्वीपणे पार केली. पायांमध्ये वेदना होत असल्यामुळे तो मागे राहिला, असे त्यांनी सांगितले.

  विधानसभा अध्यक्षाच्या अंगरक्षकास लागली धाप
  विधानसभा अध्यक्ष चंदेश्वर प्रसाद सिंह यांचे अंगरक्षक रामविलास दुबे आणि रामजी लाल सारडा यांचे अंगरक्षक श्रद्धानंद सिंह यांनी दोन फे:या मारल्यानंतर त्यांना एवढी धाप लागली की ते पुढे पळण्याच्या परिस्थितीत राहिले नाहीत. त्यांना परत मैदानात बोलावण्यात आले. दोघांना त्यांची नावे डीएसपीने विचारली तेव्हा ते आपली नावे सांगण्यास घाबरत होते. तेव्हा नवीन कुमार लकडा यांनी दोघांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले तेव्हा त्यांनी भीत भीतच आपली नावे सांगितली. रामजीलाल सारडा यांचे अंगरक्षक त्यांच्या बरोबरच राहण्यासाठी डीएसपीच्या हातापाया पडू लागला.

Trending