आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Police Pressure To Retrieve The Case, Then The Victim Was Burnt Herself In Police Station

केस परत घेण्यासाठी पोलिसांचा दबाव, नंतर पीडितेने ठाण्यातच घेतले जाळून

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - एका बलात्कारपीडित महिलेने रविवारी जयपूरच्या पोलिस ठाण्यातच स्वत:ला पेटवून घेतले. या दुर्घटनेत ती ७५ टक्के भाजली आहे. तिला एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वत:ला पेटवून घेण्याआधी तिने पोलिस आपल्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप केला. वैशालीनगर पोलिस ठाण्यात ही घटना घडत असताना तिच्यासोबत तिचा १३ वर्षांचा मुलगाही होता. 


महिलेस वाचवताना पोलिस शिपायाचे हातही भाजले गेले आहेत. तोही ४० टक्के जळाला आहे. सदर महिलेने एक महिन्यापूर्वी फतेहपूर शेखावटी येथील कारंगाछोटा येथील रहिवासी रवींद्रसिंह याच्याविरोधात बलात्काराची तक्रार दिली होती. तिच्या पतीने सांगितले, आरपीएस अधिकारी रायसिंह बेनीवाल यांनी तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणत होते. महिला आरोपीपेक्षा ४ वर्षांनी मोठी आहे. हे सर्व सहमतीने झाले आहे. सदर महिला अन्यायाची दाद मागण्यासाठी दर दोन-तीन दिवसांआड पोलिस ठाण्यात जात होती. परंतु तिला तेथून हाकलून देण्यात येत होते, असे तिच्या पतीने सांगितले.  


तपास अधिकारी संजय गोदारा हेही आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्याने केला आहे. महिलेने तक्रारीत म्हटले, माझा पती भारतीय लष्करात आहे. तो जम्मू -काश्मीरमध्ये तैनात आहे. आरोपी चार वर्षांपूर्वी पतीसोबत घरी आला होता. नंतर काही ना काही बहाणा करून तो घरी येत होता. एकेदिवशी आरोपीने तिला मित्राच्या घरी नेले. तेथे थंड पेयात काही  नशेचा पदार्थ टाकून तिला पाजले. ती बेशुद्ध पडल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. याची व्हिडिओ क्लिपही तयार केली होती.  तो क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार करत होता. पती लष्करातून निवृत्त होऊन घरी परतल्यानंतर त्याला सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर आरोपीविरोधात याच वर्षी जूनमध्ये तक्रार दिली होती. 

 

दबाव टाकला नाही, तपास सुरू होता
पीडिता व तिच्या पतीच्या आरोपावर डीसीपी विकास शर्मा यांनी सांगितले, पोलिसांनी तिच्यावर दबाव टाकलेला नव्हता. या प्रकरणाची चौकशी सुरू होती. ज्याच्याविरोधात बलात्काराचा आरोप केला आहे, तो तिचा नातेवाईकच आहे. तपास नि:पक्ष सुरू आहे.