आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये आणखी एका सेक्स रॅकेटवर पोलिसांचा छापा, दोन जणांना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर  - नगरमध्ये पोलिसांनी गुरुवारी आणखी एका सेक्स रॅकेटवर छापा टाकत हॉटेल मालकासह दोघांना अटक केली. नगर- साेलापूर महामार्गावरील सनराइज हॉटेलमध्ये कारवाई करून एका तरुणीची सुटका करण्यात आली. पंधरा दिवसांतील हा चौथा छापा असून त्यामुळे सेक्स रॅकेट चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.


मयूर प्रकाश जगताप असे अटक केलेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे. हॉटेलचा मॅनेजर रामेश्वर अण्णा पाटील (गंगापूर, जि. औरंगाबाद) यालाही अटक करण्यात आली. सनराइज हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची माहिती उपअधीक्षक मिटके यांना मिळाली. त्यानुसार कोतवाली पोलिसांच्या मदतीने हॉटेलमध्ये डमी ग्राहक पाठवण्यात आला. तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पथकाने छापा टाकला. या कारवाईत एका तरुणीची सुटका करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मिटके यांच्या पथकाने बुधवारी रात्री गांधी मैदानाजवळ भगत गल्लीत सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर छापा टाकत तीन महिलांची सुटका केली होती.