आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला : सिटी कोतवालीच्या परिसरातील देवरावबाबा चाळ येथे आलिशान फ्लॅटमध्ये कुंटणखाना सुरू होता. स्थानिक गुन्हे शाखेने या कुंटणखान्यावर शनिवारी छापा टाकला. या वेळी दोन ग्राहकासह एका महिलेला रंगेहात पकडले. त्यांच्याकडून आक्षेपार्ह साहित्य ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी सिटी कोतवाली पोेलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. उच्चभ्रू वस्तीत सुरू असलेल्या या कुंटणखान्याने परिसरातील नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी पोलिस उपनिरीक्षक छाया वाघ यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. छाया वाघ यांच्या पथकाने एका बनावट ग्राहकाला देवरावबाबा चाळीत सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पाठवले. या वेळी ग्राहक बनून गेलेल्याने फ्लॅटमध्ये पोहोचल्यानंतर पोलिसांना इशारा करताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी छापा टाकला. या वेळी पोलिसांनी एका महिलेसह दोन ग्राहक व आणखी एकाला रंगेहात पकडले. तेथील झाडाझडती घेतली असता पोलिसांना आक्षेपार्ह साहित्य सापडले. या छाप्यात पोलिसांनी दुर्गेश हरिश्चंद्र राठोड (रा. देवरावबाब चाळ), रमेश सूर्यभान चव्हाण (रा. आदर्श कॉलनी), सुशीलकुमार कमलकिशोर शर्मा (कोठारी वाटिका, मलकापूर), सुनंदा दुर्गेश राठोड यांना अटक करून वेश्यागमन करणाऱ्या पीडित महिलेला ताब्यात घेतले. आरोपींविरुद्ध पोलिसांनी पिटा अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 


पीएसआय छाया वाघ यांची सहा महिन्यातील चौथी कारवाई :

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपनिरीक्षक छाया वाघ यांच्याकडे दामिनी पथकाची जबाबदारी आहे. पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी सहा महिन्यात देहव्यापारचार छापे टाकले आहेत. येवता येथील सरपंचा कुलट चालवित असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकला होता. त्यानंतर खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन आलिशान फ्लॅटमध्ये छापे टाकून देहव्यापार करणाऱ्या महिला व ग्राहकांना पकडले. शनिवारची त्यांची चौथी कारवाई आहे. 


पीडित महिलेच्या वेश्यागमनातून घ्यायचे दलाली 

आरोपींनी पीडित महिलेला जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून अभिरक्षेत ठेवून तिच्याकडून वेश्यागमन करीत असत. ग्राहकांना हे घरी बोलावून हा धंदा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. यातून आरोपी आर्थिक फायदा करून घेत असत, असे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...