आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री 1.30 वाजता पेट्रोलींगवर असलेल्या DSP ने ऐकला गाण्यांचा आवाज, पाहीले तर सुरू होता नाईट क्लब आणि दारूच्या नशेत होते 200 तरूण-तरूणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदुर(मध्यप्रदेश)- लोकसभा निवडणुकीमुळे लागलेल्या आचार सहिंतेत पोलिस शहरात विशेष चेकींग करत आहे. यामुळे पोलिसांनी येथील एका पबवर रात्री रेड मारली. आचार संहितेत पब मालकांना पब वेळेत बंद करण्याचे आदेश दिले गेले आहेत. आदेश देऊनही विजय नगरा भागातील एक पब रात्री 1.30 वाजता उघडा होता. पेट्रोलींगच्यावेळी डी.एस.पी. पल्लवी शुक्ला यांनी पबमध्ये रेड मारली आणि त्याला बंद केले, दरम्यान तिथे अंदाजे 200 तरूण-तरूणी दारूच्या नशेत दिसले.


दारूच्या नशेत होते 200 जण
- रात्री 1.30 वाजता पबमध्ये 200 च्या आसपास तरूण-तरूणी होते, ते सगळे दारूच्या नशेत होते. आचार संहितेला भंग करून पब मालकाने पब सुरू ठेवून दारू विक्री केली होती. पोलिसांना पाहताच पबमध्ये गोंधळ उडाला, सगळेजण इकडे तिकडे पळू लागले.


पोलिसांना लाच देण्याचे प्रकरण आले समोर
- डीएसपी यांनी पब मालकावर कारवाई केली, शिवाय त्याने लाच देण्याचा प्रयत्न केला असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पब मालकावर आता कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 

बातम्या आणखी आहेत...