आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Police Raids In A Bunglow Businessmen Children Arrested From Liquor And Hukka Birthday Party

DJ आणि हुक्क्याच्या मैफिलीत होते 20 मुलं 5 मुली, वडील सब इंस्पेक्टरची कॉलर पकडून म्हणाले - मुलाच्या बर्थडे पार्टीत छापा का मारला?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद. शहरातील वासणामध्ये सोमवारी एका बंगल्यावर छापा टाकून तिथे सुरु असलेल्या दारु आणि हुक्का पार्टीमधून 15 लोकांना अटक करण्यात आली. शहरातील नामांकित उद्योगपती, बिल्डरांची मुलं दारु आणि हुक्का पार्टीमध्ये पकडण्यात आले. 


पोलिसांनी सांगितले की, मिळालेल्या सूचनेनुसार लावण्य सोसायटी येथील एका बंगल्यावर छापा मारण्यात आला. या बंगल्याच्या छतावर बर्थडे पार्टीमध्ये दारु आणि हुक्क्याची मैफील सुरु होती. निलांश शाह त्याचे वडील अंकुरभाई शाह आणि कॉलेजचे मित्र आणि हुक्का देण्यासाठी आलेले 3 लोक डीजेच्या धुनवर पार्टीमध्ये दारु पिऊन नाचत होते. जोरजोरात डीजे वाजवल्यानंतर स्थानिक लोकांनी वासणा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. 

 

पोलिसांनी छापा मारला तर वडील सब इंस्पेक्टरची कॉलर पकडून म्हणाले - माझ्या मुलाच्या बर्थडे पार्टीत छापा का मारला?
पोलिसांनी बंगल्यावर छापा मारला तेव्हा अंकुरभाईने पोलिस सब इंस्पेक्टर बीएम पटेलची कॉलर पकडून म्हटले की - आमच्या मुलाच्या बर्थडे पार्टीमध्ये छापा मारायलास का आले? मी येथून कुणालाही घेऊन जाऊ देणार नाही. तर निलांशने पोलिस सब इंस्पेक्टर पटेलच्या तोंडावर लाथ मारली. पोलिसांनी सांगितले की, या मैफिलीत 5 तरुणीही होत्या. पण मुली दारुच्या नशेत नव्हत्या यामुळे त्यांना जाऊ दिले. दारु प्यायलेल्या तरुणांना सोडण्यासाठी आणि तक्रार दाखल करु नये यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्यात आला. बाप लेकांनी पोलिसावर हल्ला केल्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतले आहे. वासणा पोलिसांनी पुढची कारवाई करत दारु, हुक्का मैफील, पोलिसांवर हल्ला करुन सरकारी कामात अडथळा निर्माण करणे अशा 3 तक्रारी दाखल केल्या आहेत. रविवारी रात्री 3.50 वाजता पकडण्यात आलेल्या तरुणांची सोमवारी मेडिकल तपासणी करण्यात आली. 

 

कारवाई: हुक्का प्रतिबंधित केस वेगळी दाळ करण्यात आली 
निलांशच्या बर्थडे पार्टीमध्ये लोकेश कसोटिया, राजेश बुनकर आणि प्रवीणभाई हुक्क्याचे साहित्य घेऊन आले होते आणि मैफिलीत सर्वांसमोर हुक्का वाढत होते. पोलिसांनी या तिघांसोबतच हुक्का पिणा-या 12 लोकांविरोधात प्रतिबंधिक हुक्काची केस वेगळी दाखल केली आहे. 

 

तरुणांना सोडवण्यासाठी पोलिस स्टेशनबाहेर लागली आलीशान गाड्यांची रांग 
दारु आणि हुक्का मैफिलीत पकडल्या गेलेल्या लोकांना सोडवण्यासाठी रविवारी पोलिस स्टेशनबाहेर आलीशान गाड्यांची रांग लागली होती. शहरातील उद्योगपती, बिल्डर आपापल्या पध्दतीने पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते.
 

 

बातम्या आणखी आहेत...