Home | National | Delhi | police recovered 1 crore rupees in cash from a spice trader

व्यापाऱ्याच्या BMW मध्ये पोलीसांना सापडले 1 कोटी रूपये, पोलिस आणि आयकर विभागाच्या कारवाईमुळे बसला धक्का , हार्ट अटॅकने झाला मृत्यू...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 13, 2019, 05:54 PM IST

पोलिसांनी निवडणुक आयोग आणि आयकर विभागाला या रकमेची माहिती दिली

  • police recovered 1 crore rupees in cash from a spice trader

    दिल्ली- पोलिसांना ज्या व्यापाऱ्याच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये मंगळवारी एक कोटी रूपये सापडले होते, त्यांचा गुरूवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. पोलिस आणि आयकर विभागाकडून झालेल्या कारवाईमुळे त्यांना जबरदस्त धक्का बसला. 83 वर्षीय रतनलाल गुप्ता एक व्यापारी होते. त्यांचा खारी बावलीमध्ये मसाल्याचा व्यापार होता. गुरूवारी मोठ्या संख्येने लोकल मार्केटची दुकाने बंद होती, पण पोलिसांच्या माहितीनुसार बाजार बंद राहावा अशी कोणतीच परिस्थिती नव्हती. सर्व दुकानदार त्यांच्या अंत्य यात्रेत सहभागी होण्यासाठी गेले होते. वसंत विहारमध्ये 9 एप्रिल रोजी चौकशी दरम्यान पोलिसांनी व्यापाऱ्याच्या कारमधुन एक कोटी रुपये हस्तगत केले होते. पोलिसांनी निवडणुक आयोग आणि आयकर विभागाला या रकमेची माहिती दिली.


    मुलाचा दावा: पैसे ब्लॅकमनी नाही
    जोरबागचे रहिवासी असलेले व्यापारी रतनलाल गुप्ता आणि त्यांचा मुलगा अजय गु्प्ताने दावा केला होता की मिळालेली रक्कम ब्लॅकमनी नाही. त्यांनी अधिकाऱ्यांना पुर्ण सहकार्य केले पण स्पष्टीकरण देऊनही त्यांचे म्हणने कोणीही ऐकले नाही. या घटनेदरम्यान त्यांच्या दुकानातून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रही हस्तगत केली. हे दुकान 'इलायची वाले' या नावावर आहे.


    मिळालेल्या माहितीनुसार, ही रक्कम रतनलाल आपल्या एका नातेवाईकाकडे पाठवत होते, पण त्यापूर्वीच कृत्य घडले. एवढी मोठी रक्कम जप्त झाल्याचा धक्का रतनलाल यांना सहन झाला नाही आणि बुधवारी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. कुटूंबातील लोकांनी त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Trending