• Home
  • National
  • Police release 33 children from Bihar to Rajnandgaon in Chhattisgarh

छत्तीसगड / मुलांची तस्करी ? : बिहारहून महाराष्ट्रात येणाऱ्या ३३ मुलांची छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे पोलिसांनी केली सुटका

सर्व मुले भागलपूर आणि कटिहारची रहिवासी, मुलांना घेऊन जाणारा मोहंमद शाकीर हुसेन पोलिसांच्या ताब्यात 

दिव्य मराठी नेटवर्क

Jun 28,2019 08:02:00 AM IST

राजनांदगाव - हावडा एक्स्प्रेसने मुंबईकडे नेण्यात येत असलेल्या ३३ मुलांची पोलिसांनी राजनांदगाव रेल्वेस्थानकावर सुटका केली. ही सर्व मुले ८ ते १० वर्षे वयाची आहेत. सर्व मुले बिहारमधील आहेत. मुलांना घेऊन जात असलेल्या मोहंमद शाकीर हुसेनला (२२) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो स्वत:ला मदरशात शिक्षक असल्याचे सांगतो आहे. नांदोरा (जि. बुलडाणा) येथील असहाबे सुफ्फा मदरशात या मुलांना शिक्षणासाठी नेत असल्याचे त्याने चौकशीत सांगितले. मात्र त्याच्याजवळ यासंबंधीची कोणतीही कागदपत्रे सापडली नाहीत. पोलिसांना मानवी तस्करीचा संशय आहे. पोलिस त्या दृष्टीने तपास करत आहेत.

रेल्वेतील महिलांना संशय आला, त्यांनी पोलिसांना माहिती दिली : रायपूरच्या दोन महिला वकील स्मृता पांडे आणि मोनिता साहू यांना संशय आला. त्यांनी आरपीएफ, स्थानिक पोलिस आणि चाइल्ड लाइनला याची माहिती दिली. रेल्वे राजनांदगाव स्टेशनवर पोहोचल्यानंतर पोलिसांनी या सर्व मुलांची सुटका केली.

X