आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Police Released 10 Pictures Of The Attackers, Student Leader Aishi Ghosh Is Among The Suspects

पाेलिसांनी केली 10 हल्लेखाेरांची चित्रे जारी, संशयितांमध्ये विद्यार्थी नेता आइशी घोषही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : जेएनयू हिंसाचार प्रकरणात दिल्ली पाेलिसांनी शुक्रवारी प्राथमिक तपासानंतर दहा हल्लेखाेरांची चित्रे जारी केली. संशयितांमध्ये विद्यार्थी नेत्या तथा छात्रसंघ अध्यक्ष आइशी घाेष देखील असल्याचा दावा पाेलिसांनी केला. जारी िचत्रांत ८ डाव्या संघटनेतील, दाेन अभाविपतील आहेत. हिंसाचाराचा तपास करणारे गुन्हे शाखेचे डीसीपी जाॅय तिर्की म्हणाले, आतापर्यंत याबाबत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाेलिस त्यांचा छडा लावेल.

विद्यापीठातील बहुतांश विद्यार्थी १ ते ५ जानेवारी पर्यंत हिवाळी सत्रासाठी आॅनलाइन नाेंदणी करू इच्छित हाेते. परंतु डाव्या पक्षाच्या विद्यार्थ्यांनी त्यास विराेध केला हाेता. ३ जानेवारी राेजी विद्यार्थ्यांचा एक गट बळजबरीने संगणक कक्षात घुसला. त्यांनी कर्मचाऱ्यांशी झटापट केली. सर्व्हरही बंद केले. त्यामुळे नाेंदणी प्रक्रिया ठप्प झाला. या प्रकरणात जेएनयू प्रशासनाने एक गुन्हा दाखल केला आहे. ४ जानेवारी राेजी विद्यार्थ्यांत पुन्हा धुमश्चक्री झाली. यात सर्व्हर कक्षाच्या काचा तुटल्या. सर्व्हर कक्षाचे त्यात खूप नुकसान झाले. त्यानंतर निदर्शक नाेंदणीसाठी रांगेत उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांवर चाल करून गेले. ५ जानेवारी राेजी बुरखाधारी जमावाने विद्यापीठात हल्ला केला. पेरियार व साबरमत हाॅस्टेलच्या काही विशेष खाेल्यांना त्यांना लक्ष्य केले हाेते. त्यात ३० पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले. एम्स ट्राॅमा सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार झाले. जेएनयू विद्यार्थी संघटनेसह स्टुडंट्स फ्रंट आॅफ इंडिया व आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, आॅल इंडिया स्टुडंट्स असाेसिएशन या नाेंदणीच्या विराेधात हाेत्या.

तीन प्राेफेसरची याचिका 

जेएनयूच्या तीन प्राेफेसरनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कॅम्पस हिंसाचारासंबंधी डेटा, सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांना संरक्षित ठेवण्यासाठी दिल्ली पाेलिस आयुक्त व दिल्ली सरकारला आदेश देण्याची विनंती या याचिकेतून करण्यात आली आहे. व्हाॅट्सअॅप ग्रुप युनिटी अगेन्स्ट लेफ्ट व फ्रेंड्स आॅफ आरएसएसच्या सदस्यांचे संदेश, फाेटाे, व्हिडिआे व फाेन क्रमांक इत्यादी संरक्षित ठेवण्याचीही विनंती करण्यात आली आहे.

शुल्कासंबंधीचा निर्णय लागू करणार 

जेएनयूचे कुलगुरू एम. जगदीश कुमार शुक्रवारी म्हणाले, वसतिगृह शुल्कासंबंधी मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सर्व निर्णय पूर्ण लागू केले जातील. विद्यापीठात १३ जानेवारी पासून नियमित तासिका सुरू हाेतील. गरज भासल्यास सत्रासंबंधीच्या नाेंदणीची तारीख वाढवली जाईल, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले.

पुरावे असल्यास जाहीर करावे : आइशी घोष

आइशी घाेषसह काही लाेकांनी हाॅस्टेलमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याचा दावा पाेलिसांनी केला. अद्याप काेणालाही चाैकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले नाही. केवळ काहींना नाेटीस पाठवून स्पष्टीकरण मागवले आहे. दुसरीकडे मात्र अाइशी घाेषने सर्व आराेप फेटाळून लावले आहेत. दिल्ली पाेलिसांनी पुरावे जाहीर करावेत, असे घाेषने म्हटले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...