आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी होऊन मुंबईत पोहोचला 14 वर्षांचा मुलगा; मामीसोबत केले असे काम, पकडल्यानंतरही धरला हट्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पोलिसांनी मुंबईत राहणाऱ्या दोन महिलांच्या तावडीतून एका 14 वर्षीय मुलाची सुटका केली आहे. त्या मुलाला सध्या बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे. मूळचा नागपूरचा असलेला हा मुलगा अवघ्या आठवीला शिकत होता. परंतु, काही दिवसांपूर्वीच त्याने नागपूर सोडून मुंबई गाठली. पोलिसांनी मुलाची ज्या दोन महिलांच्या तावडीतून सुटका केली, त्यापैकी एक त्याची मामी आहे. तसेच त्या दोन्ही महिला मुंबईतील बारमध्ये डान्सर आहेत. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही महिलांसह एकूण 4 जणांना अटक केली. 


बार डान्सर होऊ इच्छित होता मुलगा...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा बार डान्सर असलेल्या आपल्या मामीच्या लाइफस्टाइलचा फॅन झाला होता. आपणही एक दिवस मामीप्रमाणे बार डान्सर होऊ असा संकल्प त्याने घेतला होता. एवढेच नव्हे, तर त्याने यासाठी आपले लिंग परिवर्तन करण्याची तयारी सुद्धा केली. त्याने आपल्या मामाच्या फोनवर अनेकवेळा सेक्स चेंज ऑपरेशन कसे करतात आणि त्यासाठी किती खर्च येतो याची माहिती सर्च करून पाहिली होती. 


मामीसोबत लुटले 50 तोळे सोने
सेक्स चेंज सर्जरी करण्यासाठी मोठा पैसा लागेल याची माहिती त्याने घेतली होती. पैसे नसल्याने त्याने आपल्या मामीसोबत मिळून 50 तोळे लुटले. तसेच मामीसोबत फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी त्याच्या मामी, मामीची मैत्रिण आणि आणखी दोघांना अटक केली. 17 सप्टेंबर रोजी त्या सर्वांवर ही कारवाई करण्यात आली. त्याचवेळी पोलिसांनी आरोपींकडून 30 तोळे सोने, एक बाइक आणि 3 मोबाईल फोन जप्त केले आहेत. 


मुलाने धरला सेक्स चेंजचा हट्ट
पोलिसांनी संबंधित मुलाला शेल्टर होममध्ये पाठवले आहे. तसेच त्याची काउंसेलिंग केली जात आहे. परंतु, कितीही प्रयत्न केल्यानंतर तो आपल्या मामीला सोडण्यासाठी तयार नाही. त्याने पोलिसांकडे आणि समजूत काढणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सुद्धा सेक्स चेंज करण्याचा हट्ट धरला आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, मुंबईत असताना त्याने समलैंगिक डेटिंग अॅप सुद्धा डाऊनलोड केले होते. 

बातम्या आणखी आहेत...