Home | Sports | From The Field | Police saught DNA samples from Ronaldo in Las Vegas alleged rape case

स्टार फुलबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या अडचणीत वाढ, पोलिसांनी मागवले डीएनएचे सॅम्पल 

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 12, 2019, 04:12 PM IST

रोनाल्डोवर एका महिलेने दहा वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचे आरोप केलेले आहेत. 

 • Police saught DNA samples from Ronaldo in Las Vegas alleged rape case

  स्पोर्ट्स डेस्क - पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोवर लागलेल्या बलात्काराच्या आरोप प्रकरणी पोलिसांनी त्याचे डीएनए सॅम्पल मागवले आहेत. पोलिसांनी पोर्तुगालच्या या स्टारच्या डीएनए सॅम्पलसाठी इटलीतील अधिकाऱ्यांना वॉरंट पाठवले आहे. रोनाल्डो सध्या इटलीची आघाडीचा क्लब युवटेन्सकडून खेळतो. बलात्कार प्रकरणात चौकशी अधिकाऱ्यांना पीडित कॅथरीन मायोर्गा हिच्या कपड्यांवर रोनाल्डोचे डीएनए आहेत की नाही, हे तपासायचे आहे.


  पीडितेकडून तडजोडीच्या कागदावर सह्या घेतल्याचाही आरोप
  पोलिसांच्या प्रवक्त्या लॉरा मेल्टजर म्हणाल्या की, पोलिस पुरावे गोळा करण्यासाठी इतर प्रकरणांत जशी कारवाई केली जाते तीच कारवाई करत आहे. आम्ही इटलीतील अझिकाऱ्यांना एक औपचारिक रिक्वेस्ट पाठवली आहे.


  पीडितेने आरोप केला होता की, दहा वर्षांपूर्वी लास वेगासच्या एका हॉटेलमध्ये तिच्याबरोबर बलात्कार करण्यात आला होता. त्यात रोनाल्डो आणि त्याच्या टीमवर असाही आरोप झाला की त्यांना मायोर्गाशी प्रकरण उजेडात न आणण्यासाठी एक करारावर बळजबरी सह्या घेतल्या होत्या.


  मायोर्गाने दावा केला आहे की, तिला तिचे तोंड बंद ठेवण्यासाठी 3,75,000 डॉलर मिळाले होते. खटला दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पुन्हा चौकशी सुरू केली. यात वैद्यकीय तपासाचाही समावेश आहे. रोनाल्डोने यापूर्वीच त्यांच्यावर लावलेल आरोप फेटाळले आहेत. त्याच्या वकिलांनी म्हटले की, त्यावेळी जे काही झाले ते दोघांच्या संमतीने होते. त्यामुळे डीएनए असतील याच काहीही आश्चर्य नाही.


Trending