आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाशी घेणाऱ्या तरुणाचे पाेलिसांनी वाचवले प्राण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - येथील कर्वेनगर भागात राहणाऱ्या एका तरुणाने नैराश्यातून राहत्या घरी फाशी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणाच्या आईने मुलगा फाशी घेत असल्याचे पाहिल्याने तातडीने पाेलिसांना माहिती देत मुलाला वाचवण्याची विनवणी केली. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेत पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी घराचा दरवाजा ताेडत गळफास घेण्यासाठी तरुणाने छताला बांधलेली आेढणी कात्रीने कापून तरुणाला रुग्णालयात दाखल करत तरुणाचे प्राण वाचवले.


 
गाैरव ताेरडमल (रा. मावळे आळी, कर्वेनगर, पुणे) असे या तरुणाचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री पावणेदाेनच्या सुमारास घरातील सर्व झाेपले असताना गाैरव याने खाेलीचा दरवाजा बंद करत आेढणी छताला बांधून आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या आईला जाग आली व तिने खिडकीतून खाेलीत डोकावताच घडला प्रकार समोर आला.