आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस असल्याचे सांगून उरकले लग्न; सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी- बीड मुंबईमध्ये पेालिसांत कार्यरत असल्याची माहिती देत लग्न उरकून घेणारा मुलगा पोलिस नव्हे तर एका कंपनीत खासगी सुरक्षा रक्षक असल्याचे समोर आले. यानंतर मुलीच्या माहेरकडच्या मंडळींनी दिलेल्या तक्रारीवरुन मुलगा व नातेवाइकांविरोधात वडवणी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा नाेंद केला.


वडवणी तालुक्यातील कोठरबन येथील विलास वसंत मुंडे या युवकाचे साळिंबा येथील उद्धव तुळशीराम खाडे यांच्या मुलीशी काही महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. लग्न जमवताना विलास याने खाडे यांना आपण मुंबई पोलिस दलात कार्यरत असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे खाडे यांनीही पोलिस जावई मिळाल्याच्या आनंदात थाटामाटात मोठे लग्न लावून दिले होते. मात्र लग्नाच्या दोन महिन्यानंतर खाडे यांना विलास मुंडे हा पोलिस नव्हे तर खासगी सुरक्षा रक्षक असल्याची माहिती मिळाली.

 

या अनुषंगाने त्यांनी चौकशी करुन अधिक माहिती घेतली. विलास बृहन्मुुंबई महानगरपालिकेत खासगी सुरक्षा रक्षक असल्याचे सत्य समोर आले. यानंतर आपली फसवणूक केल्याचे खाडे यांच्या लक्षात आले. या प्रकरणी उद्धव खाडे यांनी वडवणी पोलिसातील तक्रारीवरुन विलास वसंत मुंडे, गिरिजाबाई वसंत मुंडे, वसंत भानुदास मुंडे, सूर्यकांत वसंत मुंडे (सर्व रा. कोठरबन, ता. वडवणी),नाथा रामकिसन केकान, श्यामल केकान (रा. केकानवाडी, ता. धारुर) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...