आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात राज्यात जाणारा धान्याचा भरलेला ट्रक पोलीसांनी पकडला, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नवापूर - नवापूर शहरातील धडधडीया रेल्वे गेटजवळ गहू व तांदूळाची भरलेली ट्रक महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात जात असताना नंदुरबार गुन्हे अन्वेषण विभागाने ट्रक पकडला आहे. संबंधित ट्रक मध्ये 350 पोती गहू व 30 पोती तांदूळ असे एकूण 50 किलो प्रमाणे 380 पोती धान्य भरलेले होते. 

संबंधीत ट्रक चालकाकडून मालाची बिलटी विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याने पोलीसांना अवैध धान्याचा ट्रक पोलीस ठाण्यात जप्त केला आहे. ट्रक मधील धान्याचे नमुने महसूल विभागाचे पुरवठा विभागाकडे तपासणीसाठी देण्यात आले आहे. सदर ट्रकमधील माल हा नवापूर शहरातील शर्मा नावाचा एका व्यापाराचा आहे. अवैध रेशनचा माल आहे की काय अशी शंका आल्याने ट्रक जप्त करण्यात आला आहे. जवळपास आठ दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...