आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळात हवाला व्यवहारातील 40 लाखांची रक्कम पोलिसांकडून जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - जबलपूर येथून मुंबई येथे ४० लाख रुपयांची राेकड बॅगेमध्ये घेऊन जाताना इतर प्रवाशांनी बॅग उचलून नेल्याचे संबंधित प्रवाशाच्या लक्षात अाल्यावर येथील जीअारपी पाेलिसांना माहिती देताच पाेलिसांनी स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून अवघ्या पाच तासांत अनवधानाने शहरातील एका लग्नाच्या वऱ्हाडाने नेलेली बॅग पाेलिसांनी त्याच्या घरी जाऊन जप्त केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. दरम्यान, ही राेकड हवालाची असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


 पाेलिस निरीक्षक दिलीप गढरी म्हणाले, १७ मे राेजी जबलपूर येथून राहुल गाेस्वामी (रा. जबलपूर) हा मुंबईला जाण्यासाठी वाराणसी-मुंबई या गाडीत बसला हाेता. त्याने बॅग सीटखाली ठेवली हाेती. प्रवासादरम्यान तो झाेपला होता. मनमाड आल्यानंतर त्याला जाग आली. या वेळी त्याला बॅग जागेवर नसल्याचे दिसले. त्यामुळे गाेस्वामी यांनी भुसावळ पाेलिस ठाणे गाठत गढरी यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली. पाेलिसांनी गाेस्वामी यांचे म्हणणे नाेंदवून घेतले. १८ तारखेची गाडी स्थानकावर अाल्याचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले. संबंधित रेल्वेतून शहरातील लग्नाचे वऱ्हाडी उतरत असल्याचे दिसले. त्यात गाेस्वामी यांची बॅगही एका मुलीजवळ असल्याचे दिसले. ही सॅक अापलीच असल्याचे गाेस्वामी यांनी सांगितले. या वेळी रेल्वे स्थानकाच्या बाहेर अाल्यावर लग्नाचे वऱ्हाड ज्या गाडीत बसले त्या गाडीचा पाेलिसांनी नंबर नाेंद करून घेतला.


गाडीच्या क्रमांकावरून पाेचले बॅगेपर्यंत
जीअारपी निरीक्षक गढरी यांनी लग्नाचे वऱ्हाड ज्या गाडीत बसून रेल्वे स्थानकाच्या बाहेरून गेले, त्या गाडीचा क्रमांक नाेंद करून त्या गाडीचा तपास लावत त्या गाडीच्या चालकाला बाेलावून घेत लग्नाचे वऱ्हाड काेठे साेडले, याची माहिती घेतली असता, लग्नाचे वऱ्हाड हे शहरातील गडकरीनगरात साेडल्याचे सांगितले. या माहितीवरून पाेलिसांनी पिल्ले यांचे घर गाठले. त्यानंतर ही राेकड जप्त करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...