Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | Police seized wine stock from Dondai-Shahada Highway

गुजरातकडे जाणारा 1 कोटी 21 हजारांचा मद्यसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई

प्रतिनिधी | Update - Jan 11, 2019, 07:52 AM IST

भरारी पथकाला नंदुरबार येथून परराज्यात निर्मित मद्यसाठा वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती.

  • Police seized wine stock from Dondai-Shahada Highway

    नाशिक- पंजाबमध्ये निर्मित कोट्यवधीचा मद्यसाठा अरुणाचल प्रदेशात न जाता गुजरातमध्ये विक्री करण्याचे मद्यतस्करांचे मनसुबे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने उधळले. पथकाने ट्रकासह १ कोटी २१ हजार रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा जप्त केला.

    बुधवारी पहाटे दोंडाईचा-शहादारोडवरील कुकडेल शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक नंदुरबार जिल्ह्यात गस्त करत असताना नंदुरबार येथून परराज्यात निर्मित मद्यसाठा वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. नाशिक विभागाने दोंडाईचा-शहादारोडवर सापळा रचला. सर्व वाहन तपासणी केली असता संशयित ट्रक (पीबी १३ एएल २६७२) थांबवला. ट्रकमध्ये राज्यात विक्रीसाठी निर्बंध असलेला पंजाबमध्ये निर्मित मद्यसाठा आढळून आला. चालक सुभाष राजू थापा (नेपाळ) याने सांगितल्याप्रमाणे, मद्यसाठा अरुणाचलमध्ये विक्रीसाठी पाठवला होता. मात्र, व्यापाऱ्याने हतो गुजरातमध्ये पोहाेच करण्यास सांगितले. पथकाने ट्रक व मद्यसाठा असा सुमारे १ कोटी २१ हजारांचा मद्यसाठा जप्त केला. संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दारुचा पुरवठा करणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Trending