आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Police Solved Most Shocking Double Murder Case Of Datiya Madhya Pradesh Illicit Relations Major Factor

नणंदेच्या नोकराशी भावजयीचे अवैध संबंध, प्रॉपर्टीसाठी रचला भयंकर कट; मध्यरात्री नणंदेचा दाबला गळा, आईच्या आवाजाने भाचा उठला, तर त्यालाही संपवले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दतिया (मध्य प्रदेश) - 25 वर्षीय विवाहिता रेखा दौहरे आणि तिच्या चार वर्षीय मुलाची गळा दाबून निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. यानंतर आरोपींनी फावड्याने दोघांचेही डोके फोडले होते. मग पुरावे लपवण्यासाठी दोघांचे मृतदेह कालव्यात फेकण्यात आले होते. पोलिसांनी या दुहेरी हत्याकांडात रेखा यांच्या भावजयी कुसुम, तिचा प्रियकर परशुराम आणि परशुरामच्या मामेभावाला अटक करण्यात आली आहे. चौकशीत आरोपी कुसुमने सांगितले की, तिच्या नणंदेची पूर्ण प्रॉपर्टी हडपण्यासाठी तिने तिला ठार करण्याचा कट रचला होता. प्रॉपर्टीसाठीच रेखाची हत्या केली. पोलिसांनी आरोपींची तुरुंगात रवानगी केली आहे.

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
एसपी मयंक अवस्थी म्हणाले, 4 जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता मकौनी गावातील रहिवासी कुसुम महेंद्र दौहरे हिने उनाव पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार देत सांगितले होते की, तिची नणंद रेखा आणि रेखाचा चार वर्षीय मुलगा शिवा यांना 3 जानेवारीच्या रात्री अज्ञात व्यक्तीने भुलवून पळवून नेले. पोलिसांनी कुसुमवर संशय आला. त्याच दिवशी पोलिसांनी कुसुमच्या घराची पाहणी केली असता तिच्या घराच्या भिंतीवर रक्ताचे डाग आढळले. जमिनीवर रक्ताचे डाग पुसल्याच्याही खुणा आढळल्या. यानंतर पोलिसांनी कुसुमला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत कुसुमने नणंद रेखा व तिच्या मुलाची हत्या केल्याचे कबूल केले. असेही सांगितले की, या दुहेरी हत्याकांडात तिचा प्रियकर परशुराम कोरी व परशुरामचा मामेभाऊ धर्मेंद्र कोरी हेही सामील होते. यानंतर पोलिसांनी कालव्या किनाऱ्यावर रेखा आणि तिच्या मुलाच्या मृतदेहाचा शोध सुरू केला. कालव्याचे पाणी बंद केल्यानंतर बुधवारी दुपारी 12 वाजता कालव्यात रेखाचा मृतदेह दिसून आला. एसपी अवस्थी यांनी उनाव पोलिसांना हत्याकांडातील आरोपी परशुराम व त्याच्या नातेवाइकाला झांशीहून पकडून आणल्यास दहा-दहा हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.


कालव्यातील पाणी बंद केले, पण बालकाचा मृतदेह अजूनही आढळला नाही...
रेखाच्या मुलाचा मृतदेह सिमेंटच्या गोणीला बांधून कालव्यात फेकण्यात आला होता. पाणबुडे मागच्या तीन दिवसांपासून मृतदेह शोधण्यासाठी गुंतले आहेत, कालव्यातील पाणीही बंद करण्यात आले आहे, परंतु गुरुवारी संध्याकाळपर्यंत मृतदेह आढळला नाही. मुख्य कालव्यात 15 फुटांहून जास्त पाणी आहे. कालव्यात अशोकनगरच्या चंदेरी धरणातून पाणी येत आहे. पाणी बंद जरी केले, तरी कालव्यातील पाणी ओसरायला चार दिवस लागतील. डीएसपी अभिनव बारंगे म्हणाले की, कालवा बंद करण्यासाठी पुन्हा एकदा सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे.

 

आरोपी भावजयी म्हणाली- जमीन हडपायची होती रेखाला, म्हणून केला मर्डर
आरोपी कुसुम म्हणाली की, मृत नणंद चार वर्षांपासून माहेरातच राहत होती. सासरे रामप्रसाद यांनी 40 बीघा जमिनीची मालकी रेखालाच बहाल केली होती. रेखाच पूर्ण इस्टेटीची देखरेख करत होती. जमीन वाहण्यासाठी रेखाने परशुरामला कामावर ठेवलेले होते. यामुळे परशुरामचे घरी येणे-जाणे सुरू असायचे. यादरम्यान परशुरामचे कुसुमसेाबत अवैध संबंध बनले. रेखा सतत कुसुमची कधी पोलिस ठाण्यात, तर कधी एसपी कार्यालयात, कलेक्टरांच्या कार्यालयात तक्रार करायची. रेखाने स्वत:च्या सुरक्षेसाठी बंदुकीचा परवानाही काढून घेतला होता.


मुलगा उठला होता, म्हणून त्यालाही संपवले...
कुसुमने चौकशीत असेही सांगितले की, रेखा तिचा लहान मुलगा शिवासोबत बाजेवर झोपली होती. मध्यरात्री ती परशुराम व धर्मेंद्रसेाबत मिळून रेखाचा गळा दाबत होते तेव्हा रेखाच्या तडफडण्यामुळे जवळ झोपलेला मुलगा उठला व मोठ्याने रडू लागला. इतरांना कळून जाईल म्हणून आम्ही त्याचाही मर्डर केला.


आता आरोपी आईसोबत राहतील दोन्ही मुले...
रेखाची हत्या करणारी कुसुम हिला 3 वर्षांची मुलगी आणि एक वर्षाहून कमी वयाचा मुलगा आहे. कुसुमच्या अटकेनंतर आता दोन्ही चिमुरडे आईसोबत तुरुंगात राहतील.  

 

 

 

बातम्या आणखी आहेत...