आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवालदाराने आपली पत्नी आणि दीड वर्षांच्या मुलीला मारली गोळी, शेजारी म्हणाले- तो रोज पिस्तुलाचा धाक दाखवायचा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पटना(बिहार)- स्पेशल ब्रांचचा हवालदार विजय नटने दारूच्या नशेत आपल्या पत्नीवर आणि दीड वर्षांच्या मुलीवर गोळी झाडली. घटना जक्कनपूर परिसरातील सीआयडी क्लब कॉलनीमध्ये सोमवारी घडली. विजय दारू पिऊन संध्याकाळी 4 वाजता घरी आला, त्या दरम्यान ड्युटीवर न जाण्यावरून पत्नीसोबत त्याचा वाद झाला. त्यानंतर त्याने सर्विस पिस्तुलाने गोळी मारली आणि गोळी त्याच्या दिढ वर्षांची मुलगी निशाच्या डोक्यातून आरपार होऊन पत्नीच्या खांद्याला लागली.


गोळी मारल्यानंतर आरोपी हवालदार फरार झला आहे. विजयच्या मोठ्या बहिणीने निशाला तत्काळ रूग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या दरम्यान घर मालकाने विजयच्या पत्नीला एका खासगी रूग्णालयात भर्ती केले, सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. जक्कनपूर पोलिसांनी घटनास्थळावरू विजयचे आयकार्ड, नाइन एमएम पिस्तुल हस्तगत केले. पोलिसांनी सांगितले की, विजयचा तपास सुरू आहे आणि त्याला ताब्यात घेतल्यावरच हत्येमागचे कारण स्पष्ट होईल.
 

बातम्या आणखी आहेत...