आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशात निवृत्त आयपीएसच्या घरी जाणाऱ्या प्रियंका गांधींना पोलिसांनी रोखले, 'पोलिसांनी गळा धरला, धक्का देऊन पाडले' : प्रियंका

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेश पोलिसांनी गळा धरल्याचा व धक्का देऊन पाडल्याचा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी शनिवारी केला. मागील आठवड्यात लखनऊत झालेल्या निदर्शनांवेळी अटक करण्यात आलेले निवृत्त आयपीएस अधिकारी एस. आर. दारापुरी यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी प्रियंका त्यांच्या घरी जात होत्या. मात्र उत्तर प्रदेश पोलिसांनी जमावबंदी लागू असल्याचे सांगत त्यांचा ताफा रोखला.

धक्काबुक्की... अन् प्रियंका स्कूटीने गेल्या

महिला पोलिसाने माझा गळा धरला, धक्काबुक्की केली, असा आरोप प्रियंकांनी केला आणि त्या स्कूटीवरून दारापुरी यांच्याकडे निघाल्या. मात्र, तरीही पोलिसांनी अडवल्यानंतर त्या पायीच रवाना झाल्या. प्रियंकांच्या या आरोपांमुळे उत्तर प्रदेशात आता नवा वाद उद््भवण्याची शक्यता आहे.

 

बातम्या आणखी आहेत...