Home | National | Other State | police stopped the marriage of juveniles in Kapurthala Punjab

ज्या फुलाने सजलेल्या गाडीत जायचे होते सासरी, त्याच गाडीत पोलिस स्टेशनमध्ये पोहचले वर-वधु, वडिलांमुळे वरात राउंडअप

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 13, 2019, 01:57 PM IST

मुलीच्या वडिलांनी आईला मागितला होता घटस्फोट

  • police stopped the marriage of juveniles in Kapurthala Punjab

    कपुरथला(पंजाब)- जिल्ह्यातील लक्खन खोले गावामध्ये 16 वर्षीय मुलगी आणि 23 वर्षीय मुलाच्या लग्नाचे सात फेरे पुर्ण होताच डीसीपीओ निताशा सागर आणि नायब तहसीलदार जसबीर कुमार यांच्या पथकाने लग्न थांबवले. अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याप्रकरणी दोन्ही पक्षांच्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर, ज्या गाडीत मुलगी सासरी जाणर होती, त्याच गाडीत ते पोलिस ठाण्यात गेले. येथे एसडीएम वरिंदर बाजवा यांच्या आदेशानुसार दोन्ही पक्षांची साक्ष नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. तर मुलीच्या आईने सांगितले की, तिचा पती नशेच्या आरोपाखाली 12 वर्षे तुरूंगवास भोगून एक महिन्यांपूर्वीच परतला आहे. त्यानेच लग्न मोडले. पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा नोंदवून मुलीला डिस्ट्रिक्ट चाइल्ड वेलफेअर कमेटीच्या स्वाधीन केले आहे.

    एक महिन्यापूर्वीच तुरूंगातून बाहेर आला होता पती
    मुलीची आई मनजीत कौरने सांगितले की, पती हरनेक सिंगला 12 वर्षांपूर्वी नशेच्या गुन्ह्यात 12 वर्षांचू शिक्षा झाली होती. त्यानंतर सासरकडच्या लोकांनी तिला घरातून हकलून लावले आणि तेव्हापासून ती माहेरी राहत होती. एक महीन्यापूर्वी हरनेक तुरुंगातून बाहेर आला. त्यानंतर महिलेने त्यांना मुलीच्या लग्नाची पत्रीका दिली. पती तिला घटस्फोट देण्यास सांगितले तर पत्नीने होकार दिला. पण तरिही पतीने तक्रार करून मुलीचे लग्न मोडले.

Trending