आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी केंद्रीय मंत्र्याचा ताफा रोखला; भाजपची तीव्र नाराजी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवनंतपुरम - सबरीमालामध्ये भगवान अय्यप्पा मंदिरातून दर्शन करून परतणारे केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन यांच्या ताफ्यातील एका वाहनास पोलिसांनी बराच वेळ तिष्ठत ठेवले. त्यावरून भाजपने केरळ पोलिसांवर जाणूनबुजून त्रस्त केल्याचा आरोप केला. मात्र, ताफ्यातील वाहनास थांबवल्याचा आरोप पोलिसांनी फेटाळून लावला. ताफा गेल्यानंतर सात मिनिटांनी आलेल्या एका वाहनाची चौकशी करण्यात आली होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी निदर्शक समजून या वाहनास रोखले होते.  


केरळ प्रदेश भाजपचे समन्वयक आर. संदीप म्हणाले, ताफ्यातील वाहनास अनेक वेळा रोखण्यात आले आणि त्यांना त्रास देण्यात आला. मंत्री राधाकृष्णन घटनास्थळी आल्यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यावरच त्यातून मार्ग काढण्यात आला. तत्पूर्वी मंगळवारी केंद्रीय मंत्र्यांची निलक्कलमध्ये पोलिसांसोबत निदर्शकांची बाचाबाची झाली होती. पोलिसांनी त्यांच्या खासगी वाहनास पंबाला जाऊ दिले नव्हते.

 

विश्वस्त या नात्याने निलंबन केले जाऊ शकत नाही, पुजाऱ्याचा दावा 

केरळच्या कासरगोड जिल्ह्यात कान्हनगाड येथील मडियां कुलोम येथील पालक मंदिराचे पुजारी टी. माधवन नम्बुदरी यांनी राज्याचे देवसोम मंत्री कडकपल्ली सुरेंद्रन यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पुजाऱ्यास निलंबित करण्यात आले. देवसोम बोर्डाची बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला. मात्र, मला मुख्य पुजारी पदावरून निलंबित केले जाऊ शकत नाही. कारण विश्वस्त या नात्याने हे पद वारशात मिळालेले आहे, असा दावा नम्बुदरी यांनी केला. 

 

सबरीमाला येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत यंदा झाली लक्षणीय घट  

 सबरीमाला मंदिराच्या दोन महिन्यांच्या जत्रेला सुरुवात झाली आहे. एका आठवड्यानंतर कडक सुरक्षा व राजकीय विरोध वाढू लागल्याने भाविकांच्या संख्येत यंदा खूप घट झाली आहे. गतवर्षी सुरुवातीच्या आठवड्यात पाच लाख भाविकांनी मंदिरात दर्शन घेतले होते. यंदा १.४२ लाख लोकांनी दर्शन घेतले. गेल्या वर्षी गर्भगृहाकडे जाणारा उड्डाणपूल भाविकांनी आेसंडून वाहत होता. या आठवड्यात मात्र हा पूल जास्त काळ खाली होता.‘अप्पम’(केकचा स्थानिक प्रकार) आणि ‘अरावन’च्या(पायासेम) विक्रीतही घट झाली आहे. त्यामुळे त्याचे उत्पादनही कमी करावे लागले आहे.  

 

 

२०० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी केलेल्या पाहणीत महिलांच्या प्रवेशावर निर्बंधाचा होता उल्लेख

सबरीमालामध्ये भगवान अयप्पा मंदिरात १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना प्रवेश करण्यापासून रोखण्याचा उल्लेख २०० वर्षांपूर्वी ब्रिटिश शासनकाळातील एका पाहणी अहवालात दिसून आला होता. या मंदिरात महिलांना प्रवेशबंदी असल्याचे अस्सल तथ्य अजूनही स्पष्ट नाही.सबरीमाला मंदिरात १० ते ५० वर्षीय महिलांना प्रवेशाची परवानगी देण्यावरून सर्वोच्च न्यायालयाच्या २८ सप्टेंबरच्या आदेशास सबरीमालाचे भाविक विरोध दर्शवू लागले आहेत. त्यामुळे पोलिसांनी मंदिराच्या मार्गावर सुरक्षेची कडक उपाययोजना केली आहे. त्याचबरोबर जमावबंदी लागू केली आहे. त्याच्या विरोधात प्रदेश भाजपने मोहिम उघडली आहे. भाविकांतूनही नाराजी आणि असंतोषाची स्थिती पाहायला मिळू लागली आहे. त्यातून भाविकांची संख्या रोडावल्याचे दिसून आले आहे.

बातम्या आणखी आहेत...