आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसानेच केला विनयभंग, मुलासमोरच फाडले महिलेचे कपडे, दोघांना दिली जीवे मारण्याची धमकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड - हरियाणामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. एकिकडे रेवाडी गँगरेप प्रकरणाने देशभरात गदारोळ माजवला आहे. अजूनही या घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. त्यात आता गुरुग्राममधील एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनीच सर्व मर्यादा ओलांडल्याचे समोर आले आहे. एका पोलिस कर्मचाऱ्यानेतर महिलेवर अत्याचार करताना तिच्या मुलासमोरच तिचे कपडे फाडले आणि दोघांना मारहाणही केली. 


पोलिस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप 
पीडित महिलेने केलेल्या आरोपानुसार एका पोलिस अधिकाऱ्याने तिची छेड काढली आणि तिच्यासह तिच्या मुलाला मारहाणही केली. आरोपी सब इन्सपेक्टर प्रचंड दारु प्यायलेला होता. त्याने महिलेचे कपडे फाडले आणि तिला तसेच तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली असे या महिलेने सांगितले. महिलेने तक्रारीत सांगितले की, ती रात्री पटेल नगर येथील टेलरकडे गेली होती. त्याचवेळी हा पोलिस अधिकारी त्याठिकाणी पोहोचला आणि त्याने महिलेचा हात पकडला. महिलेने विरोध केला तर तो तिला धमकी देऊ लागला. महिला ओरडू लागली तेव्हा तिचा मुलगा त्याठिकाणी पोहोचला. आरोपीने मुलासमोरच महिलेचे कपडे फाडले आणि त्यानंतर दोघांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकीही दिली. 


ठाण्यात दाखल केली तक्रार 
महिलेच्या तक्रारीच्या आधारावर आरोपी पोलिस सबइन्सपेक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस अधिकारी म्हणाल्या की, तपास सुरू आहे, मात्र अद्याप आरोपीची ओळख पटलेल नाही.  

बातम्या आणखी आहेत...