आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सबरीमाला परिसरात पोलिसांची दडपशाही, 68 भाविकांना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सबरीमाला -  केरळमधील सबरीमाला मंदिर परिसरात पहाटे झालेल्या आंदोलनात निदर्शकांना रोखण्यासाठी पोलिसांनी दडपशाही केल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी ६८ जणांना अटक केली. या प्रकरणात केंद्रीय मंत्री के.जे. अल्फोन्स यांनी सोमवारी केरळ सरकारला फटकारले. मंदिर परिसराला युद्धक्षेत्र करण्याचे राज्याची इच्छा दिसते, असे त्यांनी म्हटले आहे.   
पोलिसांच्या दडपशाहीच्या विरोधात केरळमध्ये असंतोष उसळला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी पोलिसांच्या विरोधात निदर्शने झाली आहेत. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

 

भगवान अय्यप्पा मंदिर सोमवारी सकाळी उघडले. तेव्हा काही भाविक तेथे अगोदर आले होते. या प्रकरणात ६८ जणांना प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. अटक केलेल्या लोकांची चौकशी केली जाणार आहे. त्यानंतरच त्यांची सुटका केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, धरपकड झाल्याच्या निषेधार्थ भाजप व संघाच्या कार्यकर्त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या निवासस्थानासमोर धरणे धरली.   दोन महिने चालणाऱ्या यात्रेचा दुसरा दिवस सानिध्धम म्हणून आेळखला जातो. त्याच दिवशी पोलिसांनी परिसरातून भाविकांची धरपकडीची घटना घडली.

 

नवीन निर्बंध : भाविक रात्री मुक्कामी राहू शकणार नाहीत

पूर्वीच्या हिंसाचारच्या घटना पाहून पोलिसांनी नवीन निर्बंध लागू केले. त्यानुसार सबरीमालामध्ये भाविकांना रात्री मुक्कामी राहता येणार नाही. कारण रात्रीच्या मुक्कामी राहणारे नंतर निदर्शने करतात. रविवारी रात्री पोलिसांना ते दिसून आले. त्यामुळेच त्यांची धरपकड करण्यात आली. राज्यातील कोची, कोल्लम, अल्फुझा, रान्नी,थोडुपझा, कालाडी, मल्लपुरम, इडुकी या ठिकाणीदेखील पोलिसांच्या दडपशाहीविरोधात निदर्शने झाली. 

 

त्रावणकोर देवस्वमची अंमलबजावणीसाठी याचिका

तसर्वोच्च न्यायालयाच्या महिलांना प्रवेश देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुदतवाढ मिळावी म्हणून न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे, असे त्रावणकोर देवस्वम मंडळाने स्पष्ट केले. हेच बोर्ड सबरीमालाचे व्यवस्थापन करणार आहे.  
 मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिला भाविकांना प्रवेशासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. अद्याप एकही महिला दर्शन घेऊ शकलेली नाही. 

 

संघाला खलिस्तानचे मॉडेल आणण्याची इच्छा : माकप

प्रदेश माकप सचिव कोंडियान बालकृष्णा म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मंदिराच्या माध्यमातून खलिस्तानचे मॉडेल आणायचे आहे. संघाला हे संस्थान ताब्यात ठेवायचे आहे. त्यामुळे केरळमध्ये अशी स्थिती निर्माण झाली आहे. आम्ही याचा निषेध करतो.  

बातम्या आणखी आहेत...