आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोर्ट ब्लेअर - अमेरिकन टुरिस्ट जॉन एलेन चाऊच्या मृतदेहाचा शोध घेण्याचा दुसरा प्रयत्नही अयशस्वी ठरला. बाण आणि भाल्यांसह उभे असलेले आदिवासी पाहून पोलिस बेटावर प्रवेश करण्याआधीच परतले. पोलिस अटक केलेल्या दोन मच्छीमारांना सोबत घेऊन गेले होते. त्यांनी डेडबॉडी बघितल्याचा दावा केला होता. आता पोलिस तज्ज्ञांच्या संपर्कात आहेत. आदिवासींना त्रास न देता बेटावर तसे पोहोचता येईल, याचा विचार केला जात आहे. त्रिलोकनाथ पंडित यांचे म्हणणे आहे की, आदिवासींना विश्वासात घेऊन तेथे जाण्याचा प्रयत्न केल्यास यश मिळू शकते.
दुसरी शोध मोहीम ठरली अयशस्वी
> पोलिसांच्या पीआरओने सांगितले की, अंदमान पोलिस, वन विभागाचे अधिकारी आणि आदिवासी कल्याण विभागाचे अधिकारी भारतीय तटरक्षकांच्या मदतीने 23 नोव्हेंबर रोजी बेटावर निघाले होते.
> अंदमानचे डीजीपी दीपेंद्र पाठकही टीममध्ये होते. पण पोहोचण्याआधीच टीमला परत फिरावे लागले. कारण आदिवासी आधीपासूनच बाण आणि भाले घेऊन त्यांच्या स्वागतासाठी उभे होते.
पोलिस करणार घटनेचे नाट्यरूपांतर
> पोलिस आता आरोपींची कसून चौकशी करत आहे. सोबतच घटनाक्रम आणि चाऊच्या बेटावर पोहोचलेल्या मार्गाची माहिती घेऊन घटनेचे नाट्यरूपांतर करण्याच्या तयारीत आहे. यामुळे चाऊची डेडबॉडी लवकरात लवकर मिळू शकेल.
> अंदमानचे डीजीपी दीपेंद्र पाठक यांनी सांगितले की, ते अनेक तज्ज्ञांच्या संपर्कात आहेत. याद्वारे आदिवासींना कोणतेही नुकसान न पोहोचवता आयलँडवर जाण्याचा मार्ग शोधत आहेत.
काय म्हणाले तज्ज्ञ
> भारताचे मानववंश शास्त्रज्ञ त्रिलोकनाथ पंडित सेंटिनल आदिवासी समाजासोबत संबंध ठेवू शकणारे एकमेव व्यक्ती आहेत. त्यांच्या मते, सेंटिनल समाजाच्या लोकांचे असे मानने आहे की, याठिकाणी बाहेरील लोक फक्त अधिकार गाजविण्यासाठी येतात.
> सरकार आणि प्रशासनाला अमेरिकन नागरिकाचा मृतदेह आणायचा असेल तर त्यांनी आदिवासी लोकांवर बलाचा वापर करू नये. आधी एका टीमने जाऊन आदिवासींना विश्वासात घ्यावे. त्यानंतर प्रशासनाने संपूर्ण तयारीने मृतदेहाला आणायला हवा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.