आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Love Jihad चे आरोप लावून पोलिसांची मुलीला मारहाण; म्हणाले, \'मुल्ला जास्त आवडतो का?\' Video Viral

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेरठ - धर्मांध संघटनांकडून कपल्सला त्रास दिले जात असल्याच्या घटना नेहमीच ऐकायला येतात. परंतु, उत्तर प्रदेशात चक्क पोलिसांचीच धर्मांधता दाखवणारा धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मेरठ जिल्ह्यात टिपण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये एक कपल पोलिसांच्या जीपमध्ये बसलेला दिसून येतो. या कपलसोबत दोन महिला काँस्टेबल सुद्धा आहेत. ते सगळेच तरुणीला मारहाण करत आहेत. महिला पोलिस तरुणीला मारहाण करत असताना त्यांच्यासोबत बसलेला दुसरा एक हवालदार त्या तरुणीला शिवराळ भाषेत बोलताना दिसून आला. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ त्याच हवालदाराने शूट करून स्वतः व्हायरल केला आहे. 


VHP च्या कार्यकर्त्यांनी कॉलेजमध्ये पकडले...
मेरठच्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी फिरत होते. त्याचवेळी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते येऊन धडकले. दोघे एकाच धर्माचे नसल्याचे त्यांना कळाले. त्यांनी या दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडल्याचा दावा केला. यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केला. सोबतच, पोलिसांना बोलावून हे प्रकरण लव्ह जिहादचे असल्याचे आरोप लावले. घटनास्थळी महिला हवालदारांसह पोलिसांची जीप पोहोचली. त्या दोघांना जीपमध्ये बसवून पोलिस स्टेशनला नेण्यात आले. त्याच दरम्यान पोलिसांनी दोघांना बेदम मारहाण केली. महिला पोलिसांनी तरुणीचे केस ओढून तिला चापटा मारल्या. जीपमध्ये बसलेल्या पुरुष हवालदाराने या घटनेचा सेल्फी व्हिडिओ घेतला आणि त्याने अतिशय गलिच्छ भाषेत दोघांना शिवीगाळ केली. 


आरोपी पोलिस कर्मचारी निलंबित
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. सर्वत्र या व्हिडिओची चर्चा उडाली. मेडिकल कॉलेज हद्दीतील पोलिस स्टेशनचा हेड काँस्टेबल सलेक चंद, महिला हवालदार नीतू सिंह आणि महिला हवालदार प्रियंका या तिघांनाही तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच गाडी चालवणारा होमगार्डचा शिपाई सैन सेरपाल याला बडतर्फ करण्यात आले. यूपी पोलिसांनी आपल्या ट्विटर हॅन्डलवर या घटनेची माहिती दिली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...