Home | National | Gujarat | Police took 130 kg person who sold illegal liquor on a cot and taken to police station

अवैध दारू विकणाऱ्या 130 किलोच्या व्यक्तीस पोलिसांनी नेले बाजेवरून

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Mar 11, 2019, 12:16 PM IST

गुजरातमधील अहमदाबाद शहरात अवैध दारू विकली जात होती. या विक्रेत्याचे वजन १३० किलो इतके होते.

  • Police took 130 kg person who sold illegal liquor on a cot and taken to police station

    अहमदाबाद - गुजरातमधील अहमदाबाद शहरात अवैध दारू विकली जात होती. या विक्रेत्याचे वजन १३० किलो इतके होते. त्याला पोलिसांनी अटक केली पण ठाण्यात त्याला न्यायचे कसे, असा प्रश्न पोलिसांना पडला. शेवटी त्यांनी शक्कल लढवली. त्यांनी आरोपीस बाजेवरून पोलिस ठाण्यात नेले. यासंदर्भात माहिती अशी की, राजेंद्र ऊर्फ राजिओ नावाच्या विक्रेत्याच्या दुकानावर छापा टाकला. तेथे पोलिसांना मोठ्या प्रमाणावर दारूचा साठा आढळला.


    पोलिसांनी सांगितले, त्याचे घर दाट लोकवस्तीच्या भागात आहे. गल्ली अरुंद असल्याने कोणतेही वाहन तेथे जाऊ शकत नव्हते. दोन आठवड्यापूर्वीच आरोपीने आपले वजनदार शरीर व श्वास घेण्यासंबंधीचा आजार असल्याचे कारण देत पोलिसांच्या तावडीतून पलायन केले होते. यासाठीच त्याला उचलून नेण्याचे पोलिसांनी ठरवले.

Trending