आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामदर्डीतील पारधी समाज वस्तीवर पोलिसांकडून महिलांना अमानुष मारहाण, रवींद्र काळेसह इतर ९ जणांविरोधातील मोक्का रद्द करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- पारधी बांधवाच्या वस्तीवर ग्रामीण पोलिसांनी शनिवारी अचानक छापा टाकून महिलांना बेदम मारहाण केली आहे. जो समाज वाळूच्या तस्करीपासून कोसोदूर आहे, त्यांच्यावर वाळू तस्करी आरोपाबरोबर चोरी, दरोडे, लुटमारी आदीचे गुन्हे दाखल करून मोक्का लावून आदिवासी पारधी समाजाची पोलिसांनीच पारध केली आहे. याप्रकरणी भारत माता आदिवासी पारधी समाज संघटनेच्यावतीने खोटे गुन्हे व मोक्का मागे घ्यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. 


न केलेल्या गुन्ह्यांचा आरोप, समाजाची तक्रार 
रवींद्र काळेसह तिघांना ताब्यात घेतले. यामध्ये रवींद्र काळे, सुरेश काळे, शंकू भोसले यांच्यावर न केलेल्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांवर चोरी, दरोडे, लुटमारी, वाळू तस्करी आदी गुन्हे दाखल करून मोक्का लावला आहे. पोलिसांनी आमच्यावर लावलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, मोक्का रद्द करावा, अशी मागणी भारत माता आदिवासी पारधी समाजाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले, नगरसेवक राजेश काळे यांनी केली आहे. 


निवेदनात पारधी समाजावर गुन्हेगारीचा डाग लागला आहे. आम्हाला माणूस म्हणून जगण्याची संधी द्यावी. रवींद्र काळेसह इतरांवर लावलेला मोक्का रद्द न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी ऐपतबाई काळे, आकुबाई भोसले, पल्लवी काळे, किरण काळे, सुरेखा कळे, रंजना भोसले, उषा शिंदे, महाराणी काळे, अंबिका भोसले, मिनाक्षी भोसले आदी उपस्थित होते. 


पारधी समाज वस्तीवर येऊन पोलिसांनी महिलांना बेदम मारहाण केली. जिल्हा अनूसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक समिती अध्यक्षपदाची जबाबदारी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी. दोषींवर कारवाई करावी. 
- ज्ञानेश्वर भोसले, मोहोळ 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...