आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंधनटंचाईने सायकलवरून पोलिसांची गस्तीची सुरुवात; पुलिस प्रमुख म्हणाले, एका वाहनात दररोज ४५ लिटर गॅसोलिन व दुचाकीत १० लिटर इंधन लागते 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेक्सिको सिटी- मेक्सिकोमधील एका शहरात इंधनाची टंचाई होती. तेव्हा पोलिसांनी सायकलवरून गस्त घालण्यास सुरुवात झाली. पोलिस प्रमुख जॉर्ज अमाडोर यांनी सांगितले, महापालिकेकडून या सायकल्स किरायाने घेतल्या आहेत. शहरात ४० गॅस स्टेशन आहेत. येथे २० लाख लोक इंधन भरतात. गेल्या १७ दिवसांपासून येथे गॅसोलिनची तीव्र टंचाई जाणवते आहे. यामुळे २५० पोलिस सायकलवरून शहरात गस्त घालत आहेत. पोलिसांनी इंधन कमी वापरावे, अशी अपेक्षा आहे. 

 

एका दिवसात ४५ लि. गॅसोलिनचा वापर 
पुलिस प्रमुख म्हणाले, एका वाहनात दररोज ४५ लिटर गॅसोलिन व दुचाकीत १० लिटर इंधन लागते. हा खर्च वाचविण्यासाठी व इंधनाची बचत करण्यासाठी पोलिस कर्मचारी शहरात गस्त घालत आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...